AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ल्याचा प्रयत्न; कोणती शहर होती टार्गेटवर?

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील तीन राज्यांमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या एअर डिफेंस सिस्टमनं हा हल्ला परतून लावला आहे, पाकिस्तानच्या आठ मिसाईल पाडण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानकडून पुन्हा भारतावर हल्ल्याचा प्रयत्न; कोणती शहर होती टार्गेटवर?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2025 | 10:06 PM
Share

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे, भारतानं मंगळवारी पाकिस्तामध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला देखील भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.

भारतानं आज सकाळी पाकिस्तानच्या 15 शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या एअर डिफेंस सिस्टमनं हा हल्ला परतून लावला आहे.

पाकिस्तानने भारताच्या तीन राज्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारताच्या एअर डिफेंस सिस्टमनं पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडावर पाडलं आहे. पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि आठ मिसाईल पाडण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून जम्मू विद्यापीठ आणि जम्मूच्या विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याचबरोबर भारताच्या बॉर्डर लाईनवर जी शहर आहेत, त्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यामध्ये जम्मू विद्यापीठ, जम्मू विमानतळ,  कुपवाडा, राजौरी, पुंछ, पठाणकोट, अमृतसर, या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या एअर डिफेंस सिस्टमनं हा हल्ला परतून लावला आहे, पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडण्यात आले आहेत.

भारताचा ड्रोन हल्ला

दरम्यान भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं आज सकाळी पाकिस्तानच्या पंधरा शहरांवर ड्रोन हल्ला केला, पन्नास ड्रोन हल्ले करण्यात आले, पाकिस्तानची रडार सिस्टिम या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली आहे, दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भारतानं हा हल्ला परतून लावला आहे, पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडण्यात आले आहेत. तसेच ड्रोन देखील पाडण्यात आले आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...