AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO ने मैलाचा दगड रोवला; 3D-printed rocket engine ची चाचणी यशस्वी

3D-printed rocket engine : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने यशाला गवसणी घातलीच. गेल्यावर्षी काही प्रयोगाने हुलकावणी दिली. पण जिद्दीने, नेटाने इस्त्रोने प्रयोग पुन्हा केला. त्यात इस्त्रोला मोठे यश आले. चंद्रयान, आदित्य-१ मोहिमांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले.

ISRO ने मैलाचा दगड रोवला; 3D-printed rocket engine ची चाचणी यशस्वी
इस्त्रोने करुन दाखवले
| Updated on: May 11, 2024 | 9:52 AM
Share

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शिरपेचा अजून एक मानाचा तुरा खोवल्या गेला. गेल्यावर्षी इस्त्रोने अफाट कामगिरी करुन दाखवली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. चंद्रयान, आदित्य एल 1 आणि गगनयान मोहिमेने भारताच्या आशा बळकट झाल्या आहेत. अंतराळात दैदिप्यमान कामगिरी करण्याची स्वप्न भारत उराशी बाळगून आहे. त्यातच आता आणखी एक जोरदार कामगिरी इस्त्रोने केली आहे. त्याच्या अनेक मोहिमांसाठी मोठा उपयोग होणार आहे.

3डी प्रिंटेड रॉकेट इंजिनची यशोगाथा

इस्त्रोने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे. इस्त्रोने जलद आणि कमी वेळेत भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले होते.  भारताने PS4 इंजिन तयार केले. त्याला 3डी प्रिंटेड रॉकेट इंजिन असे प्रचलित नाव आहे. या इंजिनाच्या मदतीने 97 टक्के कच्चा मालाची बचत होईल आणि उत्पादन वेळेत 60 टक्के कपात होईल. या द्रव रॉकेट इंजिनामुळे मोहिमांचा खर्च आटोक्यात येण्यास मदत होईल. हे इंजिन एएम तंत्रज्ञानावर आधारीत आहे.

पीएसएलव्ही प्रक्षेपण रॉकेटमध्ये इंजिन

पीएसएलव्हीच्या चौथ्या टप्प्यातील पारंपारिक मशिनरी आणि वेल्डिंगचा वापर करुन पीएस4 इंजिन तयार करण्यात आले आहे. या इंजिनाचा यशस्वी उपयोग पहिल्या टप्प्यात पीएस1 मध्ये पण करण्यात आला होता. पीएस4 इंजिनला पीएसएलव्ही प्रक्षेपण रॉकेटमध्ये बसविण्यात येईल.

665 सेंकदांची यशस्वी चाचणी

या इंजिनाची 665 सेंकदांपेक्षा अधिक वेळ यशस्वी चाचणी करण्यात आली. चाचणीत हे इंजिन सर्व मापदंडांवर बसत असल्याचे समोर आले. पीएस4 इंजिनाला PSLV कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

अंतराळात वसाहतीची योजना

2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत, 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील. त्यांची चंद्रावर वसाहत असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवात जसे संशोधन सुरु आहे. तसेच संशोधन प्रकल्प तिथे सुरु होतील. मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाणी गवसल्यास मोठा फायदा होईल.

शुक्राची पण मोहिनी

गगनयाननंतर इतरही अनेक मोहिमा इस्त्रोच्या पुढ्यात आहेत. त्यात Shukrayaan-1 ही खास मोहिम आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशनअंतर्गत भारत शुक्र ग्रहाच्या कक्षेत अंतराळ यान प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. या वर्षाच्या अखेरीस ही कामगिरी भारत करु शकतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.