कूनो नॅशनल पार्कातील नाल्यात सापडला ‘पवन’, आतापर्यंत 13 चित्ते दगावले, चिंता वाढली
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. पोस्टमार्टेमनंतर या चित्त्याच्या मृत्यूचे कारण समजणार आहे.

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. चित्ता पवन याला खुल्या जंगलात सोडण्यात आले होते. या चित्त्याचा मृत्यू पावसाळी नाल्यात बुडून झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या चित्त्याचा पावसाळी नाल्यात बुडून मेला असावा असे म्हटले जात आहे. या चित्त्याच्या मृत्यू नेमका कशाने झाला याचा शोध घेतला जात आहे. पोस्टमार्टेमनंतर या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघडकीस येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कुनो नॅशनल पार्कातील चित्त्याचा मृत्यू झाल्याने चित्ता व्यक्त केली जात आहे. नामिबियातून आलेल्या चित्त्यांपैकी पवन चित्त्याचा मृतदेह एका पावसाळी नाल्यात पडलेला आढळला. पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. पवनच्या मृत्यूने वन खात्यात खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी पार्कातील एका बछड्याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कुनो नॅशनल पार्कातील अधिकाऱ्यांनी सांगितले की पवन एकमेव नर चित्ता होता. ज्याला पिंजऱ्या बाहेर खुल्या जंगलात सोडले होते. पवनच्या सर्व हालचालीवर वन विभागाचे अधिकारी नजर ठेवून होते. मंगळवारी वन विभाग त्याचे लोकेशन तपासण्याचा प्रयत्न करीत असताना खूप वेळ त्याचा लोकेशन ट्रेस होत नव्हते. त्यानंतर त्याचा शोध सुर झाला. त्यानंतर त्याचा थेट मृतदेहच सापडला. नॅशनल पार्कातील आत जंगली झुडुपातील पावसाळी नाल्यात पवनचा मृतदेह सापडला. जेव्हा त्याला तपासले तेव्हा त्याची हालचाल बंद पडली होती. तो नाल्यात निपचित पडला होता. जोरदार पावसाने नाल्याला पुर आला होता. पवनला कोणतीही बाह्य जखम झालेली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे बुडूनच त्याचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते.
आतापर्यंत 13 चित्ते दगावले
कूनो नॅशनल पार्कात आतापर्यंत एकूण 13 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. पवनला धरुन एकूण 5 बछडे आणि 8 वयस्क चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. मादी चित्ता गामिनीने मार्च महीन्यात 6 बछड्यांना जन्म दिला होता. एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका बछड्याचा मृत्यू 5 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. बछड्याच्या माकड हाडाचे फक्चर झाले होते,त्याच्यावर उपचार सुरु होते.त्यातच त्याचा मृत्यू झाला.
