Operation Sindoor: जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन रोखण्यास सांगितलं नाही, PM मोदींची संसदेत माहिती

विरोधकांनी अमेरिकेच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर स्थिगित केल्याचे म्हटले होते. मात्र आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतील भाषणात उत्तर दिले आहे.

Operation Sindoor: जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन रोखण्यास सांगितलं नाही, PM मोदींची संसदेत माहिती
PM Modi Speech
| Updated on: Jul 29, 2025 | 7:16 PM

भारताने पाकिस्तान विरुद्ध राबवलेले ऑपरेशन सिंदूर स्थगित केलेले आहे, मात्र ते संपलेले नाही. विरोधकांनी अमेरिकेच्या दबावामुळे ऑपरेशन सिंदूर स्थिगित केल्याचे म्हटले होते. मात्र आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेतील भाषणात उत्तर दिले आहे. पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “सैन्याने अचूकपणे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत दहशतवाद्यांच्या नाभीवर हल्ला केला. यावेळीही आमच्या सैन्याने शतप्रतिशत लक्ष्य हासिल केलं आहे. देशाचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. काही लोक जाणूनबुजून काही गोष्टी विसरतात. पण देश विसरत नाही. 6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी ऑपरेशन केलं. त्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपलं लक्ष्य सांगितलं होतं. आम्ही आमचं काम केलं.

6 आणि 7 मे रोजी आमचं ऑपरेशन समाधानकारक झाल्यावर मी डंके की चोटवर सांगतो, भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला काही मिनिटातच दाखवून दिलं की आमचं लक्ष्य होतं ते आम्ही पूर्ण केलं आहे. पाकिस्तानमध्ये समजदारी असती तर दहशतवाद्यांसोबत खुलेआण उभे राहण्याची चूक केली नसती. त्यांनी निर्लज्जपणे दहशतवाद्यांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही तयार होतो. आम्हीही संधीची वाट पाहत होतो. पण आम्ही जगाला सांगितलं होतं की आमचं लक्ष दहशतवादी, त्यांचे आका आहेत. पण पाकिस्तानी सैन्याने हरकत केली आणि त्यांना वर्षानुवर्ष लक्षात राहिल असा धडा आम्ही शिकवला.

आमच्या मिसाईलने पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात मोठा प्रहार केला. पाकिस्तानने कल्पानाच केली नव्हती. पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचं काम केलं. पाकिस्तानने याचा कधी विचार केला नव्हता. तेव्हा पाकिस्तानने डीजीएमओला फोन करून विनंती केली. बंद करा. बरंच मारलं. आता अधिक मार खाण्याची ताकद नाही. प्लीज हल्ला रोखा. हा पाकिस्तानच्या डीजीएमएचा फोन होता. भारताने आधीच सांगितलं होतं. आम्ही आमचं लक्ष पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल. टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आम्ही हल्ला रोखला.

आमचं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आम्ही हल्ला रोखला. जगातील कोणत्याही नेत्याने भारताचं ऑपरेशन रोखण्यास सांगितलं नाही. 9 तारखेला रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते तासभर प्रयत्न करत होते. माझी सैन्यासोबत मिटिंग होती. नंतर मी त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. हे त्यांनी मला सांगितलं.

मी त्यांना सांगितलं, जर पाकिस्तानचा हा हेतू असेल तर त्यांना खूप महागात पडेल. पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ. आम्ही गोळीचं उत्तर गोळीने देऊ असं सांगितलं. त्याच दिवशी आपण पाकिस्तानच्या सैन्य शक्तीला हादरवलं होतं. आज पाकिस्ताही जाणून आहे की भारताचं प्रत्येक उत्तर पूर्वी पेक्षा अधिक तगडं असतं. भविष्यात वेळ पडली तर भारत काहीही करेल हे त्यांना माहीत आहे.”