AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्मीमधील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर खरंच मारलं जातं का? नेमकं काय आहे कारण? सत्य तुम्हालाही माहिती नसेल

कुत्रा हा असा प्राणी आहे, जो अतिशय प्रामाणिक आहे. तसेच तो बुद्धिमान देखील आहे. तो ट्रेनिंगला लवकर प्रतिसाद देत असल्यामुळे आर्मी आणि पोलीस दलांमध्ये विशिष्ट प्रजातीची कुत्री पाळली जातात. मात्र रिटायरमेंटनंतर या श्वानांचं काय केलं जातं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

आर्मीमधील कुत्र्यांना रिटायरमेंटनंतर खरंच मारलं जातं का? नेमकं काय आहे कारण? सत्य तुम्हालाही माहिती नसेल
आरमीमधील कुत्र्यांचं रिटायरमेंटनंतर काय करतात?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 5:36 PM
Share

आर्मी आणि पोलीस दलांमध्ये तपास कामांसाठी कुत्र्यांची मदत घेतली जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे, जो बुद्धिमान तर आहेच परंतु अतिशय प्रामाणिक देखील असतो. कुत्र्यांना सहज ट्रेन केलं जाऊ शकतं. तसेच तो नुसत्या वासावरून देखील एखाद्या व्यक्तीचा सहज माग काढू शकतो. त्यामुळे चोरांचा तसेच एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांना श्वानांची खूप मदत होत असते. कोणत्याही देशाची आर्मी किंवा पोलीस दल असो तिथे एक श्वानपथक हे असतंच. आर्मी आणि पोलीस दलासोबत काम करण्यासाठी काही खास विशिष्ट प्रजातीच्या श्वानांची निवड केली जाते. त्या श्वानाला ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंग नंतर हे श्वान रिटायरमेंटपर्यंत आर्मी किंवा पोलीस दलासोबत काम करतात. मात्र अनेकदा असं देखील म्हटलं जातं की, रिटायरमेंटनंतर आर्मीमधील कुत्र्यांना मारलं जातं. नेमकं त्यामागचं सत्य काय आहे? तुम्हाला माहितीये का?

पूर्वी म्हणजे ब्रिटीश काळात ही पद्धत होती. ब्रिटीश काळात आर्मीमधून एखादा श्वान निवृत्त झाला की, त्याला मारण्यात येत होतं. त्यामागचं लॉजिक असं होतं की, या श्वानाने अनेक वर्ष आर्मीसोबत काम केलं आहे, त्यामुळे त्याला देशाच्या अनेक गुप्त गोष्टी माहिती असतात. असा श्वान शत्रूच्या हाती लागला तर त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा श्वानांना मारलं जायचं. साधारणपणे एका श्वानाचं आयुष्य हे 20 वर्षांपर्यंत असतं, आर्मी किंवा पोलीस दलातील श्वान हे 13 व्या किंवा 14 व्या वर्षी निवृत्त होतात, कारण तेव्हा त्याची क्षमता कमी झालेली असते.

दरम्यान याविरोधात प्राणीमित्र संघटनांकडून आवाज उठवण्यात आला, त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आला आहे. आता आर्मी किंवा पोलीस दलातील कुत्र्यांना मारलं जात नाही. तर त्यांना आता मेरठ येथील ओल्ड ऐज होममध्ये ठेवण्यात येतं. तिथे त्यांची काळजी घेतली जाते. किंवा काही श्वान ही दत्तक देखील दिली जातात. आर्मीमधील कोणताही श्वान दत्तक देण्यापूर्वी त्याला पुन्हा एकदा सामान्य वर्तणुकीचं ट्रेनिंग दिली जाते. अगदीच नाइलाज असेल म्हणजे एखाद्या श्वानाला दुर्धर आजार असेल आणि तो बरा होणारच नसेल तर अशा स्थितीमध्ये क्विंचित प्रसंगी अशा श्वानांना दया मरणं दिलं जातं. मात्र आता आर्मीमधील कोणत्याही श्वानाला मारलं जात नाही, रिटायरमेंटनंतरही त्यांचा सांभाळ केला जातो.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?