Article 370 : अरविंद केजरीवाल आणि मायावतीही मोदी सरकारच्या पाठीशी

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याप्रमाणेच मायावती यांच्या राज्यसभेतील खासदारांनीही केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला.

Article 370 : अरविंद केजरीवाल आणि मायावतीही मोदी सरकारच्या पाठीशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढण्याच्या निर्णयाचं आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेही समर्थन केलंय. आम्ही सरकारच्या निर्णयाचं समर्थन करतो, यामुळे जम्मू काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल, अशी अपेक्षा करु असं ट्वीट आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलंय. केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याप्रमाणेच मायावती यांच्या राज्यसभेतील खासदारांनीही केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला.

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

त्यापूर्वी राज्यसभेत बसपाचे खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी कलम 370 काढण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी बसपाचं समर्थन जाहीर केलं. कलम 370 काढण्यासंबंधी जी विधेयकं आहेत, त्याला बसपाचा पाठिंबा असेल, असं मिश्रा म्हणाले होते.

विरोध करणारे पक्ष

काँग्रेस

पीडीपी

नॅशनल कॉन्फरन्स

समाजवादी पक्ष

आरजेडी

डीएमके

जेडीयू

मुस्लीम लीग

टीएमसी

सीपीआय

सीपीआयएम

पाठिंबा देणारे पक्ष

आम आदमी पक्ष

तेलगू देसम पक्ष

एआयएडीएमके

वायएसआर काँग्रेस

बिजू जनता दल

अकाली दल

लोकजनशक्ती पार्टी

आरपीआय

शिवसेना

इतर एनडीए पक्ष

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI