AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याची केजरीवाल यांची योजना, 35 आमदार राजीनामा देणार ? दिल्ली निकालानंतर काँग्रेसचा दावा

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मोठ्या पराभवानंतर पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे म्हटले जात आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आता पंजाबचे मुख्यमंत्री होण्याच्या बेतात आहेत, अशी चर्चा सुरु झाली आहे.

पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याची केजरीवाल यांची योजना, 35 आमदार राजीनामा देणार ? दिल्ली निकालानंतर काँग्रेसचा दावा
Bhagwant maan and arvind kejariwal
| Updated on: Feb 09, 2025 | 5:25 PM
Share

दिल्लीत मोठा पराभव झाल्यानंतर आता आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अरविंद केजरीवाल आता पंजाबचा मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे काँग्रेसने पंजाबात पुन्हा निवडणूकांसाठी सज्ज राहा असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. दिल्लीतील मानहाणी कारक पराभवानंतर राजकीय समीकणे बदलू शकतात. पंजाबचा मु्ख्यमंत्री बनण्याची केजरीवाल यांची योजना असल्याचे उघड झाले आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पंजाबात मध्यावधी निवडणूकासाठी सज्ज होण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. काँग्रेस नेत्यांनी देखील आपकडे वळलेल्या मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळविण्याचे गरज आहे. तसेच काँग्रेसमध्ये अंतर्गत दुफळी सोडविणे राज्यातील काँग्रेस पक्षात जोश भरणे हे गरजेचे असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

पंजाबात आपविरोधात कांग्रेसची मोहिम

काँग्रेस आता पंजाबात आपच्या सरकारच्या त्रूटी शोधून काढण्यासाठी मोठे अभियान उभारणार आहे. जाहीरनाम्यातील वचने पूर्ण न करणे, कायदा – सुव्यवस्थेची स्थिती या मुद्द्यांकडे काँग्रेस लक्ष देणार आहे. म्हणजे आपचा प्रभाव कमी होईल याकडे काँग्रेसने लक्ष देण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे पंजाबात आपली गेलेली पत परत मिळविण्याची ही संधी असल्याचे काँग्रेसला वाटत आहे. पंजाबात काँग्रेसचे पारंपारिक मतदार आहेत. त्यावरच आपने डल्ला मारला आहे.

अरविंद केजरीवाल आता पंजाबला जाणार

दिल्लीतील मोठ्या पराभवानंतर केजरीवाल आता पंजाबला जात आहेत. तेथे ते मुख्यमंत्री बनण्याचा शेवटचा प्रयत्न करणार आहेत असे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा यांनी म्हटले आहे. नुकतेच आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोडा यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की पंजाबचा मुख्यमंत्री एक हिंदू देखील होऊ शकतो. तसेच मुख्यमंत्री पदी बसलेला व्यक्ती योग्य असायला हवा त्याला हिंदू किंवा शीख या चष्म्यातून पाहू नये असे अरोरा यांनी म्हटले होते.

दिल्ली निवडणूकांच्या निकाला आधी हे महत्वपूर्ण वक्तव्य आप नेतृत्व आता कशाप्रकारे पंजाबात केजरीवाल यांचे पुनर्वसन करण्यासाछी रस्ता कसा तयार करीत आहे याचे निदर्शक आहे.लुधियानात सध्याच्या आपचा आमदाराच्या निधनानंतर विधानसभेची एक जागा आधीच रिकामी झाली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना तेथे निवडणूक लढणे सोपे होईल असे म्हटले जात आहे.

दिल्लीच्या पराभवानंतर ‘आप’ चे तुकडे

दिल्लीतील मोठ्या पराभवानंतर आम आदमी पार्टीत फूट पडेल. पंजाबाला मध्यावधी निवडणूकासाठी सज्ज राहावे लागणार आहे असे गुरुदासपूरचे काँग्रेस नेते, खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी म्हटले आहे. रंधावा पुढे म्हणाले की आपचे ३५ आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहे.

दिल्लीत निकालानंतर पंजाबात आता भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील, मद्य, धान्य खरेदीतील एमएसपी घोटाळे बाहेर पडतील. काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैहरा यांनी हा पराभवाला पक्ष आणि राष्ट्रीय संयोजकांसाठी अपमानस्पद आहे. या खोट्या क्रांतीकारकांनी आत्मसाद केलेला छळ आणि खोटेपणाच्या राजकारणाचा हा पराभव आहे. जे आपल्या प्रत्येक आश्वासनापासून पळून लांब गेले. हे निकाल भगवंत मान यांना पंजाबात खोटेपणा आणि सूडाच्या राजकारणापासून दूर राहण्याचा संदेश देत आहेत.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.