AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच नाही, देशातील या मोठ्या राज्यातही कांग्रेसचा एकही आमदार नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. परंतू, काँग्रेससाठी हे काही नवीन नाही. सध्या देशातील आणखी चार राज्यात काँग्रेस शून्यावर आहे. यात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यांचा देखील समावेश आहे.

दिल्लीच नाही, देशातील या मोठ्या राज्यातही कांग्रेसचा एकही आमदार नाही
| Updated on: Feb 09, 2025 | 4:26 PM
Share

देशाची राजधानी दिल्लीतील सर्वसामान्य मतदारांनी आम आदमी पार्टीला सपशेल पराभव करीत भाजपाच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे. परंतू तिसऱ्यांदा काँग्रेसच्या जागात कोणताही बदल झालेला नाही.विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या आहेत. परंतू देशाची राजधानी हे एकमेव राज्य नाही जेथे काँग्रेसच्या पाठी कोरी राहीली आहे. तर देशात अशी अनेक राज्य आहेत जेथे काँग्रेसचा श्रीगणेशाही देखील झालेला नाही. देशातील किमान चार राज्ये अशी आहेत ज्याच्यात काँग्रेसचा एक देखील आमदार नाही. यात आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यांचा त्यात समावेश आहे.

आंध्र विधानसभेत १७५ जागा, काँग्रेस शून्य

दक्षिणेतील आंध्रात साल २०२४ मध्ये मे महिन्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या, या निवडणूकात काँग्रेस मजबूतीने उतरली होती. परंतू काँग्रेसला एक देखील जागा जिंकता आली नाही.पक्षाचे बहुतांशी आमदार तिसऱ्या क्रमांकावर ढकलेले गेले आहेत किंवा डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. आंध्रप्रदेशात एनडीएचे १६४ आमदार आहेत. तर विरोधी पक्ष वायएसआरचे ११ आमदार आहेत. विशेष म्हणजे आंध्रात साल २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेस शून्य

पश्चिम बंगाल विधानसभेत २९४ जागा आहेत. २०२१ च्या मे महिन्यात येथे निवडणूका झाल्या होत्या काँग्रेस डाव्या आघाडीसोबत मैदानात उतरली होती परंतू काँग्रेसला विजय मिळाला नाही. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचे सरकार असून पक्षाचे २२४ आमदार निवडून आले होते. तर विरोधी पक्ष भाजपाकडे ६६ आमदारांचे बळ आहे. २०२२ मध्ये मुर्शिदाबादच्या सागर दिघी जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता. परंतू हा आमदारही तृणमूलमध्ये गेला. त्यानंतर प.बंगालमध्ये जेवढे पोट निवडणूका झाल्या. त्यात काँग्रेसला विजय मिळाला नाही.

सिक्कीममध्ये ३२ जागा, सर्व एनडीएकडे

सिक्किम विधानसभेच्या एकूण ३२ जागा आहेत. एकेकाळी सिक्कीम काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतू आता काँग्रेसकडे एक आमदार नाही. सिक्कीममध्ये काँग्रेस झीरो बनला आहे. सिक्कीमच्या सर्व ३२ जागांवर सिक्किम क्रांतिकारी मोर्चा यांच्या ताबा आहे. एसकेएम येथे भाजपाच्या सोबत एनडीएसोबत आहे.

नागालँड कांग्रेसची रिकामी झोळी

नागालँड विधानसभेत एकूण ६० जागा आहेत. येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला नाही. नागालँड येथे एनडीपीपी या पक्षाकडे २५, भाजपाकडे १२, एनसीपीकडे ७, एनपीपीकडे ५, एलजेपी ( आर ) कडे २, आरपीआयकडे २ आमदार आहेत. एनपीएच्या जवळ नागालँडमध्ये २ आणि ५ अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे नागालँड येथे सर्व पक्ष सरकारमध्ये सामील आहेत. येथे कोणताही विरोधी पक्ष नाही.

पूर्वोत्तरमधील 3 राज्यांत प्रत्येकी एक आमदार

अरुणाचल विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत. एनडीएजवळ येथे ५९ जागा आहेत. अरुणाचल येथे काँग्रेसचा केवळ एक आमदार आहे. याच प्रकारे मेघालय आणि मिझोरममध्ये देखील कांग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. याच प्रकारे मणिपूर आणि पुडुचेरी राज्यात काँग्रेसकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. पुडुचेरीत अलिकडेपर्यंत काँग्रेसचे राज्य होते. मणिपूरमध्ये देखील काँग्रेसचा एकेकाळी दबदबा होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.