AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मोठी कारवाई; 26 माओवाद्यांना कंठस्नान

21 एप्रिल ते 11 मे दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त दलांनी 21 दिवस चाललेल्या कारवाईत 1.72 कोटी रुपयांचे बक्षिस असलेल्या 31 नक्षलवाद्यांना ठार मारलंय. नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबविण्यात आलं.

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मोठी कारवाई; 26 माओवाद्यांना कंठस्नान
Maoists killed in encounter with security forces Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 21, 2025 | 1:26 PM

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझदमदच्या जंगली भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात 26 माओवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अबुझमदमधील एका विशिष्ट भागात एक वरिष्ठ माओवादी नेता लपल्याची माहिती मिळाल्यानंतर नारायणपूर, दंतेवाडा, विजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधून जिल्हा राखीव रक्षकांनी (DRG) ही कारवाई केली. अबुझदमदचा मोठा भाग नारायणपूरमध्ये असून त्याचा काही भाग विजापूर, दंतेवाडा, कांकेर आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही पसरलेला आहे. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकड्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दलांनी ‘ब्लॅक फॉरेस्ट’ या नावाने नक्षलविरोधी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत एकूण 214 नक्षलवादी लपण्याची ठिकाणं आणि बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तर शोधमोहिमेदरम्यान एकूण 450 आयईडी, 818 बीजीएल शेल, 899 कोडेक्स, डेटोनेटर आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय जवळपास 12 हजार किलोग्रॅम अन्नसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

नक्षलवादी संघटनेचे सरचिटणीस वसवा राजू याचाही चकमकीत मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. वसवा राजू हा खूप जुना नक्षलवादी नेता आहे. दंडकारण्यामध्ये नक्षलवादी संघटनेचा पाया रचणाऱ्यांपैकी तो एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो माडमध्ये आश्रय घेत होता. त्याच्यावर एक कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बक्षीस होतं. सैनिकांनी नक्षलवाद्यांच्या सर्वांत गुप्त ठिकाणांवरच हल्ला केला. जर वसवा राजू खरंच या चकमकीत मारला गेला असेल तर नक्षलवाद्यांवर सैनिकांचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मानला जाईल.

हे सुद्धा वाचा

इंद्रावतीजवळ गेल्या 50 तासांपासून शोध मोहीम सुरू असून आतापर्यंत 26 हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याची माहिती गृहमंत्री विजय शर्मा यांनी दिली. नारायणपूर आणि विजापूरच्या संयुक्त क्षेत्रात नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई सुरू आहे. या चकमकीत एक सैनिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 130 नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत. त्यापैकी 110 हून अधिक बस्तर विभागात मारले गेले आहेत. 2025 मध्ये देशाच्या विविध भागातून 105 हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत 164 जणांनी आत्मसमर्पण केलं आहे.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.