JNU मध्ये विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला, 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला, 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक गंभीर जखमी

जवाहर लाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Attack on JNU Studetns and Teachers).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jan 07, 2020 | 10:35 AM

नवी दिल्ली : जवाहर लाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात रविवारी (5 जानेवारी) सायंकाळी काही अज्ञात लोकांनी घुसून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला (Attack on JNU Studetns and Teachers). तोंड झाकलेल्या हल्लेखोरांच्या हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या होत्या. त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या. याव्यतिरिक्त 40 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले आहेत. यात 30 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचा समावेश आहे (Attack on JNU Studetns and Teachers). जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रविवारी (5 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास तोंड झाकलेल्या जवळपास 50 गुंडांनी विद्यापीठात घूसून विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. त्यांनी विद्यापाठ परिसरातील कार आणि होस्टेलचीही तोडफोड केली.

देशावर राज्य करणारे फॅसिस्ट धाडसी विद्यार्थ्यांना घाबरत आहेत : राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जेएनयूमधील हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, ‘जेएनयूमध्ये गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर केलेला हल्ला स्तब्ध करणारा आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. देशावर राज्य करणारे फॅसिस्ट धाडसी विद्यार्थ्यांना घाबरत आहेत. जेएनयूमधील हिंसेने त्यांची भीती स्पष्ट दिसते.’

जेएनयूतील हल्ला सुनियोजित कट : शरद पवार

शरद पवार यांनी जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवरील हल्ला सुनियोजित असल्याचं म्हटलं आहे. तसेच या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “जेएनयूतील विद्यार्थी आणि शिक्षकांवरील हल्ला सुनियोजित हल्ला आहे. मी या लोकशाहीविरोधी हिंसेचा तीव्र निषेध करतो. हिंसेचा वापर करुन लोकशाही मुल्यांची आणि विचारांची दडपशाही करता येणार नाही.”

“ही घटना विद्यापीठाच्या संस्कृतीच्या विरोधात”

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “जेएनयूमधील हल्ल्याची छायाचित्रे पाहिली. या हिंसेचा स्पष्टपणे निषेध करतो. ही घटना जेएनयूच्या परंपरेच्या आणि संस्कृतीच्या विरोधातील आहे.”

‘परिस्थितीला विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरु जबाबदार’

जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचे सचिव सुरजीत मजूमदार यांनी विद्यापीठातील या परिस्थितीला विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरु जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले,, ‘आम्ही या परिस्थितीला विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरुंना जबाबदार मानतो. आज हॉस्टेलमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. अनेक शिक्षक गंभीर जखमी आहेत. ज्या पद्धतीने कुलगुरु विद्यापीठाचं काम करत आहेत, त्यामुळे येथील स्थिती अधिक वाईट होत आहे. विद्यापीठातील लोकशाही प्रक्रिया दिवसेंदिवस नष्ट केली जात आहे.”

जेएनयू शिक्षक संघाचे विक्रमादित्य म्हणाले, “जमाव माझ्या पत्नीच्या मागे धावत होता. माझ्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला गेला. आम्ही रात्री पुन्हा येऊन घराला आग लावू अशी धमकी जमावाने दिली. आम्ही पोलिसांना फोन केला, मात्र पोलिसांकडून कोणतीही मदत मिळाली नाही. आमच्या मदतीला पोलिसही येत नाही. हल्ला होऊन दोन तास झाले तरी विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था देखील आलेली नाही. त्यांना मी माझ्या घरावर हल्ला झाल्याचं सांगितलं. त्यानंतरही ते आले नाही आणि पोलिसांनाही पाठवलं नाही.”

“विद्यार्थी विद्यापीठातही सुरक्षित नसतील, तर मग देश पुढे कसा जाणार?”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हल्ल्यादरम्यान पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “जेएनयूमध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यावर धक्का बसला. विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारण्यात आलं. पोलिसांनी तात्काळ यात हस्तक्षेप करावा. जर देशातील विद्यार्थी विद्यापीठ परिसरात सुरक्षित राहणार नसतील, तर मग देश पुढे कसा जाणार?”

जेएनयू हल्ल्याविरोधात देशभरात आंदोलन

जेएनयूमध्ये हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांनी आंदोलन केलं. दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन केलं. तसेच जेएनयू हल्ल्याचा निषेध केला. मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी केली.

पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन  इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात (FTII) देखील या हल्ल्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें