Baba Ka Dhaba: कांता प्रसाद यांचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती नाजूक

Baba ka Dhaba | प्राथमिक माहितीनुसार, कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री भरपूर मद्यसेवन केले. दारूच्या नशेतच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात, असा अंदाज आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

Baba Ka Dhaba: कांता प्रसाद यांचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती नाजूक
बाबा का ढाबा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jun 18, 2021 | 2:31 PM

नवी दिल्ली: गेल्यावर्षी सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे रातोरात प्रसिद्ध झालेले ‘बाबा का ढाबा’चे (Baba ka Dhaba) मालक कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर कांता प्रसाद यांना तातडीने दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या नाजूक असल्याचे सांगितले जाते. (Baba Ka Dhaba kanta Prasad attempt to suicide in Delhi)

प्राथमिक माहितीनुसार, कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री भरपूर मद्यसेवन केले. दारूच्या नशेतच त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असाव्यात, असा अंदाज आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

कोरोनामुळे नवं रेस्टॉरंट बंद पडलं, कांता प्रसाद पुन्हा स्टॉलवर कामाला

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियामुळे अचानक प्रकाशझोतात झालेले ‘बाबा का ढाबा’चे (Baba ka Dhaba) मालक कांता प्रसाद यांच्यावर आपलं नवं रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली होती. लॉकडाऊनच्या काळात त्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता कांता प्रसाद यांनी पुन्हा दिल्लीतील आपल्या जुन्या जागेत व्यवसाय सुरु केला होता.

गेल्यावर्षी यूट्युबर गौरव वासन याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमुळे ‘बाबा का ढाबा’ (Baba Ka Dhaba) रातोरात प्रसिद्ध झाला होता. कोरोना काळात उदरनिर्वाह ठप्प झाल्याने ‘बाबा का ढाबा’ चालवणारे 80 वर्षीय वृद्ध दांपत्य अक्षरशः हालाखीचे जीवन जगत होते. मात्र, युट्यूबर गौरव वासनने या दाम्पत्याचा केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यांच्या ढाब्यावर अक्षरशः लोकांची रीघ लागली होती.

त्यानंतर अनेक लोकांनी कांता प्रसाद यांना आर्थिक मदतही देऊ केली होती. या माध्यमातून कांता प्रसाद यांना तब्बल 45 लाख रुपयांची देणगी मिळाली होती. याच पैशातून कांता प्रसाद यांनी नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. त्याचा महिन्याचा खर्च साधारण लाखभर रुपयांचा होता. मात्र, लॉकडाऊनमुळे इतर हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे त्यांचेही कंबरडे मोडले. त्यांच्या या नव्या रेस्टॉरंटचे महिन्याचे भाडे 35 हजार इतके होते. हॉटेलमध्ये लागणारे सामान, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्च मिळून साधारण लाखभर रुपये लागत होते. त्या तुलनेत कांता प्रसाद यांना रेस्टॉरंटमधून 30 ते 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे कांता प्रसाद यांनी हे रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे.

हेही वाचा :

Baba Ka Dhaba | ‘ढाबा’ मालक कांता प्रसाद यांची पोलीस ठाण्यात धाव, प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या युट्यूबरविरोधात तक्रार!

ट्विटरवर ‘बाबा का ढाबा’ ट्रेंडमध्ये; ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याच्या मदतीसाठी लोकांची रीघ

Baba Ka Dhaba | मटर पनीर खाण्यासाठी अपारशक्ती खुरानाची ‘बाबा का ढाबा’ला भेट!

(Baba Ka Dhaba kanta Prasad attempt to suicide in Delhi)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें