ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी पतंजलीकडून प्रयत्न, नेमका प्लॅन काय?
पतंजली ही कंपनी 2006 साली सुरू करण्यात आली. आज या कंपनीचा मोठा विस्तार झाला आहे. आता ही कंपनी शहरांसोबतच ग्रामीण भागाच्याही बळकटीसाठी प्रयत्न करत आहे.

पतंजली ही देशातील सर्वांत मोठी आयुर्वेदिक एफएमसीजी कंपनी आहे. या कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला विस्तार केलेला आहे. सोअर्सिंग, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही क्षेत्रांना मजबूत करण्याचा प्रयत्न या कंपनीकडून केला जात आहे. कंपनीच्या या प्रयत्नांमुळे भारताची अर्थव्यवस्थाही बळकट होण्यास मदत मिळत आहे.
रोजगार, कृषी क्षेत्रात कंपनीचे मोठे योगदान
पतंजली ही कंपनी 2006 साली सुरू करण्यात आली. आज या कंपनीचा मोठा विस्तार झाला आहे. आता ही कंपनी शहरांसोबतच ग्रामीण भागाच्याही बळकटीसाठी प्रयत्न करत आहे. पारंपरिक वितरण साखळी आणि अन्य काही गोष्टींच्या मदतीने या कंपनीकडून ग्रामीण भागातील रोजगार, कृषी, स्थानिक उत्पादन यांच्या विस्तारातही ही कंपनी आपले मोठे योगदान देत आहे.
शेतकरी आणि ग्रामीण उद्योगांना पाठिंबा
पतंजलीच्या म्हणण्यांनुसार ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी या कंपनीने आतापर्यंत अनेक महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. पतंजली ही कंपनी तेल, धान्य, आयुर्वेदिक वनस्पती अशा स्वरुपाचा कच्चा माल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करते. या दृष्टीकोनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे, असे पतंजलीचे म्हणणे आहे. सोबतच या धोरणामुळे ग्रामीण भारतातील लघु आणि मध्यम स्वरुपांच्या उद्योगांना पाठबळ लाभले आहे, असे या कंपनीकडून सांगितले जाते.
शेतकरी समृद्धी कार्यक्रमाची सुरुवात
या कंपनीने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि भारतीय कृषी कौशल्य परिषद (ASCI) यांच्या सोबतीने शेतकरी समृद्धी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान इत्यादींविषयी प्रशिक्षण दिले जाते.
हजारो स्थानिकांना नोकरीची संधी
या कंपनीने नुकतेच यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण (YEIDA) परिसरात एक मेगा फूड आणि हर्बल पार्कची स्थापना केली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 500 कोटी रुपयांचा बिस्कीट मॅन्यूफॅक्चरिंग प्लान्ट 600 कोटी रुपयांचे मिल्क प्रोसेसिंग यूनिट, 200 कोटी रूपयांचे हर्बल फार्म यांची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पांमुळे तेथील हजारो स्थानिकांना नोकरीची संधी मिळणार आहे, असे या कंपनीचे मत आहे.
किरकोळ विक्रेत्यांना मोठा फायदा
या कंपनीने त्यांचे उत्पादन देशभरात पोहोचवण्यासाठी आतापर्यंत हजारो फ्रेंचॅयजी आणि मेगा स्टोअर चालू केलेले आहेत. या फ्रेंचायजींमुळे शहरी भागांतल्या किरकोळ व्यापर वाढला आहे, असा या कंपनीचा दावा आहे.पारंपरिक छोटे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करून या कंपनीने वेगवेगळ्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेले आहे. यामुळे फक्त कंपनीच्या उत्पादन विक्रीत फक्त वाढच झाली नाही तर किरकोळ विक्रेत्यांना मोठा फायदा झाला आहे, असा या कंपनीचा दावा आहे.
