फक्त FMCG नव्हे तर शिक्षण, आरोग्य क्षेत्रातही पतंजलीचे काम!
पतंजली फक्त भारतीय बाजारात आपले स्थान भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत नाही. तर याउलट भारतीय समाजजीवन समृद्ध करण्यासाठीही या कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत.

देशात जेव्हा जेव्हा स्वदेशी उत्पादन आणि आयुर्वेदाचा उल्लेख केला जातो तेव्हा-तेव्हा योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. पतंजली कंपनीने अनेक क्षेत्रात विस्तार करून आपल्या आयुर्वेद आणि स्वदेशीच्या प्रसार-प्रचारात हातभार लावला आहे. आता ही पतंजली फक्त टुथपेस्ट, शँम्पू, पीठ अशा एफएमसीजी उत्पादनांवरच सीमित राहिलेली नाही. आता पतंजली शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरम यासारख्या अन्य क्षेत्रांतही काम करत आहे.
आयुर्वेदापासून ते स्वावलंबनापर्यंत
पतंजलीने अगोदरच्या काळात आयुर्वेदिक उत्पादनांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर आपल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक मार्गेटिंकशी जोडून एफएमसीजी क्षेत्राला एक नवी ओळख निर्माण करून दिली. आता या कंपनीने फक्त नफाच्या विचार लक्षात न घेता समाजातील प्रत्येक वर्गाला फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.
शिक्षण आणि संस्कार क्षेत्रात काम
पतंजली योगपीठ तसेच या योगपीठाशी संबंधित शैक्षणिक संस्थांनांत आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक भारतीय ज्ञान यांचं एकत्र शिक्षण दिलं जातं. पतंजली गुरुकुल, पतंजली विद्यापीठ, वेदांचं शिक्षण देणाऱ्या शाळा यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या शैक्षणिक संस्थानंत विद्यार्थ्यांना फक्त पदवी दिली जात नाही तर संस्कृती, संस्कार, सेवा आदी मूल्यंदेखील शिकवली जातात.
आरोग्य क्षेत्रात विस्तार
पतंजली आयुर्वेदिक रुग्णालय आणि संशोधन केंद्रांच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद यांच्यात एक सेतू बांधला जात आहे. पारंपरिक उपचार पद्धतीसोबतच या इथे नवे संशोधन करण्यालाही प्रोत्साहन दिले जाते.
शेती क्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न
पतंजली कंपनीतर्फे जैविक शेती करण्याला प्रोत्साहन दिले जाते. शेतकऱ्यांनी रसायनांचा वापर न करता शेती करावी, जैविक खतांचा वापर करावा यासाठी पतंजली तर्फे प्रयत्न केला जातो. चांगली बियाणे उपलब्ध करून देणे, शेतीमालाला चांगल्या बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे यासारखी कामेही पतंजलीतर्फे केली जात आहेत.
दरम्यान, पतंजलीतर्फे पर्यावरण संवर्धन आणि जतन यासाठीही काम केले जाते आहे. त्यामुळे पतंजली फक्त एक एफएमसीजी ब्रँड एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर पतंजली एक वैचारिक आंदोलन म्हणून समोर येत आहे. भारतीय बाजारात भक्कम स्थान निर्माण करणं एवढाच या कंपनीचा हेतू नाही. तर भारतातील जीवन आणखी समृद्ध कसे करता येईल, यासाठीही या कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत.
