Baba Vanga Prediction : ज्याची भीती होती तेच घडतंय, बाबा वेंगांचं तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत समोर; 28 जुलैबाबत काय म्हटलंय?
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी 2025 बाबत मोठं भाकीत केलं होतं. इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे भाकीत खरं ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मध्यपूर्वेमधील तणाव वाढला आहे. या युद्धात आता अमेरिकेची एन्ट्री झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे, अमेरिकेनं इराणला अल्टिमेटम दिला होता, डेडलाईन संपताच अमेरिकेनं इराणवर हल्ला केला. त्यामुळे आता इराण देखील अधिक आक्रमक झाला आहे. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर चीन, रशिया, उत्तर कोरिया यासारख्या बलाढ्य देशांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष इराण आणि इस्रायल युद्धाकडे लागलं आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. चीन आणि तैवानमध्ये देखील संघर्ष सुरू झाला आहे, त्यामुळे तिसरं महायुद्ध होणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
याच दरम्यान जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत केलेली भविष्यवाणी आता प्रचंड व्हायरल होत आहे. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये 1911 साली झाला होता, तर मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली, त्यातील काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. बाबा वेंगा यांच्याबद्दल असंही म्हटलं जातं की, एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली मात्र त्यानंतर त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली.
दरम्यान त्यानंतर आता बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल केलेलं भाकीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 2025 मध्ये जगावर अनेक मोठी संकट येतील, युरोपमध्ये मोठा संघर्ष सुरू होईल, त्यानंतर हा संघर्ष हळूहळू संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं होतं. जगभरात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे बाबा वेंगा यांचं हे भाकीत खरं ठरणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान दुसरीकडे अनेक ज्योतिषांनी असं देखील भाकीत केलं आहे की, सात जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत खप्पर योग, षडाष्टक योग सारखे अनेक खतरनाक योग तयार होत आहेत, त्यामुळे महायुद्ध होणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
