AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाला अटक, काय आहे प्रकरण ?

धीरन शास्त्री म्हणतात त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच लोकांच्या समस्या कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या भावाला अटक, काय आहे प्रकरण ?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2023 | 4:40 PM
Share

रायपूर : काही बाबा, साधू वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करतात. अनेक जण आपणास दैवी देणगी मिळाल्याचे सांगतात. सध्या बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज (Bageshwar Dham) या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री (bageshwar dham sarkar) लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. परंतु पोलिसांनी त्यांचे भाऊ शालीग्राम गर्ग याला अटक केली आहे. एका व्हायरल व्हिडिओनंतर ही अटक झाली आहे.

कोण आहे शालिग्राम गर्ग

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. ११ फेब्रुवारी रोजी गावातील एका दलित परिवाराकडे लग्न होते. त्यावेळी रात्री १२ वाजता बागेश्वार धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांचा छोटा भाऊ शालिग्राम गर्ग आला. त्यांनी लोकांना मारहाण सुरु केली. तसेच पिस्तूलही रोखले. त्यावेळी त्याच्या तोंडात सिगरेट होती अन् त्याने मद्दही प्राशन केले होते. त्याने महिलांशी गैरवर्तन केले आणि पिस्तुल दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हवेत गोळीबार करून लग्न रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे बाराती घाबरले आणि खाण्यापिऊन गावी परतले.

व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शालिग्राम तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन लोकांना धमकावत आणि शिवीगाळ करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने एका व्यक्तीला पकडून सांगितले की बुंदेलखंडचे लोकनृत्य चालणार नाही. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी बागेश्वर धामचे गाणे वाजवण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने लोकांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी भादवि कलम २९४, ३२३, ५०४, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

धीरेंद्र शास्त्री यांचा दावा काय

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार देशभर प्रसिद्ध झाले आहे. मोठ्या संख्येने लोक बागेश्वर धामच्या दरबारात जातात आणि आपल्या अडचणी व प्रश्न मांडतात.

बागेश्वर सरकारचा दावा आहे की, त्यांना दैवी देणगी मिळाली आहे. लोकांच्या समस्या त्यांना दैवी देणगीच्या माध्यमातूनच कळतात. बागेश्वर महाराजांच्या या शक्तीमुळे बागेश्वर धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.