AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उंच तटबंदी, कुंपणात वीजप्रवाह,धर्मांतरणासाठी मुलींना या खास खोलीत ठेवायचा छांगुरबाबा

सफेद कोठीतील एका खोलीतून हातावर बांधण्याचा 'कलावा' (पवित्र धागा) आणि उर्दूमध्ये लिहिलेली धार्मिक पुस्तके देखील सापडली आहेत. यामुळे छांगुर बाबाने धर्मांतर करताना पीडितांची दिशाभूल करण्यासाठी पवित्रधाग्या सारख्या हिंदू चिन्हांचा वापर केल्याचा संशय आहे.

उंच तटबंदी, कुंपणात वीजप्रवाह,धर्मांतरणासाठी मुलींना या खास खोलीत ठेवायचा छांगुरबाबा
| Updated on: Jul 09, 2025 | 6:57 PM
Share

उत्तर प्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यात छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन याच्यावर बळीजबराने धर्मांतरण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली होती. या छांगुर बाबा अटक केल्यानंतर त्याच्या आलीशान घराची देखील चर्चा होत आहे. या सफेद रंगाच्या कोठीत दहा खोल्या होत्या. त्यातून अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. त्यात हिंदू लोक मनगटाला बांधतात तसे धागे गंडेदोरे सापडले आहेत. या सफेत कोठीवर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. या कोटीत २ बीएचके सारखे सुसज्ज फ्लॅट बांधलेले होते. यात आलिशान बेड, मोठे हॉल आणि सर्व सोयी सुविधा होत्या. प्रत्येक रुममध्ये स्वतंत्र किचनची व्यवस्था होती. त्यामुळे येथे लांबचा मुक्काम करण्याची सर्व सोयी सुविधा होत्या असे यावेळी उघड झाले आहे. विष्ठा

एका खाजगी चॅनलची टीम या छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन याच्या कोठीत पोहचली तेव्हा या खोल्यात ‘कलावा’ ( मनगटाला बांधला जाणारा केशरी वा रंगीबेरंगी धागा ) उर्दूत लिहिलेली धार्मिक पुस्तके सापडली आहेत. त्यामुळे असा संशय वाढला आहे की छांगुर बाबा धर्मांतरण करण्यासाठी पीडीतांना हिंदूंची प्रतिकांचा वापर करुन भ्रमित करायचा, म्हणजे मुलगी आणि तिचे कुटुंबियांची दीशाभूल होईल.आता धर्मांतरण प्रकरणाचा तपास ईडी करणार आहे. ईडीने पोलिसांकडून एफआयआरची कॉपी घेतली आहे.

कुंपणात वीजेचा प्रवाह

सुरक्षेच्या नावाखाली कोठीला बाबाने चारी बाजूंनी १५ ते २० फूटांची उंच भिंत बांधून तिला लावलेल्या काटेरी तारांच्या कुंपणाला वीजप्रवाह सोडला जायचा. त्यामुळे कोणीही आत येऊ नये याची काळजी घेतली जात होती. त्यामुळे आजबाजूचे लोक या भिंतीच्या जवळपासही भटकत नव्हते.

जमालुद्दीन याची ही कोठी आता प्रशासनाच्या निगराणी खाली असून येथील सर्व वस्तूंचा तपास केला जात आहे. या आलिशान कोठीचा वापर धर्मांतरणासाठी केला जात होता. जेथे मुलींना फूस लावून बराच काळ ठेवले जात होते.

बुलडोझर फिरवला

छांगुर जमालुद्दीन बाबाच्या आलीशान कोठीवर प्रशासनाने बुलडोझर कारवाई सुरु केली आहे. ही कोठी अवैधपणे तयार केली होती असा आरोप होत आहे. या कोठीत आपल्या सहकाऱ्यांसह राहून हा बाबा धर्मांतरणाचे रॅकेट चालवत होता. या कोठीला त्याच्या काळ्या कृत्यांचा अड्डा म्हटले जात आहे. येथे अनेक बेकायदेशीर कृत्ये केली जात होती. प्रशासनाने मोठा बंदोबस्तात या कोठीच्या अनधिकृत बांधकामांना पाडण्याची कारवाई केली आहे. छांगुर बाबा त्याचे सहकारी नवीन रोहरा आणि नीतू रोहरा यांच्यासह रहात होता.

आलीशान कोठीत ४० खोल्या, दुबईतील सामान

४० खोल्यांच्या या कोठीवर छांगुरबाबाने तीन कोटी रुपये खर्च केले आहे.छांगुरबाबा केवळ इम्पोर्टे वस्तूंचा वापर करायचा. खास दुबईतून सामान मागवायचा. त्याचे एक पाऊल कोठीत तर दुसरे पाऊल परदेशात असायचे. काही दिवस येथे रहायचा आणि बाकी दिवस परदेशात घालवायचा.बुलडोझर कारवाईत या कोठीत एक गुप्त खोली होती असा छडा लागला आहे. याच खोलीत धर्मांतरण केलेल्या मुलींना ठेवले जात होते.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल