AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मोठा विमान अपघात टळला, प्रवाशानं ओपन केलं विमानाचं इमर्जन्सी गेट, खाली उडी मारण्याचा प्रयत्न

मोठी बातमी समोर आली आहे, चेन्नई विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर प्रवाशानं विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

मोठी बातमी! मोठा विमान अपघात टळला, प्रवाशानं ओपन केलं विमानाचं इमर्जन्सी गेट, खाली उडी मारण्याचा प्रयत्न
AirplaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 6:34 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, चेन्नई विमानतळावर मोठा विमान अपघात थोडक्यात टळला आहे. विमान लँड झाल्यानंतर एका प्रवाशानं अचानक विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशाने विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन केल्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. हे विमान शारजाहावरून चेन्नईला आलं होतं. या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3:23 ला लँड झालं, विमान लँड झाल्यानंतर अवघ्या एक मिनिटानंतर या प्रवाशानं इमर्जन्सी गेट ओपन करून विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यानंतर विमानतळ प्रशासनाकडून तातडीने हा रन वे बंद करण्यात आला.

समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद शरीफ मोहम्मद नजमुद्दीन असं या 29 वर्षीय प्रवाशाचं नाव आहे. त्याने विमान लँड झाल्यानंतर विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून टॅक्सी वे 5 वर उडी मारली. ही घटना अंदाजे पहाटे 3:25 च्या सुमारास घडली. हे विमान 3:23 ला लँड झालं होतं, त्यानंतर अवघ्या एकच मिनिटामध्ये या प्रवाशाने विमानाचं इमर्जन्सी गेट ओपन करून उडी मारल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांमुळे विमानाची धावपट्टी बंद करण्यात आली. रन वे बंद करण्यात आल्यामुळे त्याचा विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला. त्यामुळे याच दरम्यान बँकॉक आणि अबू धाबीला जाणाऱ्या विमानांनी धावपट्टी 12 वरून उड्डाणं केलं.

या घटनेसंदर्भात माहिती देताना एका एअर पोर्ट अधिकाऱ्याने सांगितले की ही घटना घडल्यानंतर विमानाला दुसरीकडे हलवण्यात आले. त्यानंतर पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ही धावपट्टी पुन्हा सुरू झाली. दरम्यान या घटनेमुळे काही काळ विमान वाहतुकीवर देखील परिणाम झाला. या धावपट्टीवरून उड्डाण करणारे विमान दुसऱ्या धावपट्टींवर वळवण्यात आले. बँकॉक आणि अबू धाबीला जाणाऱ्या विमानांनी धावपट्टी 12 वरून उड्डाण केलं. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. या प्रवाशानं विमान लँड होताच अचानक इमर्जन्सी गेट ओपन केलं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!