Donald Trump : ट्रम्प यांना जबर धक्का, भारताच्या या मित्र देशाने तोडले अमेरिकेसोबतचे सर्व संबंध, मोठ्या घोषणेनं जगभरात खळबळ
अमेरिकेला मोठा धक्का बसला असून, भारताच्या मित्र राष्ट्रानं अमेरिकेसोबतचे सर्व संबंध तोडले आहेत, तसेच यावेळी या देशाकडून मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे.

टॅरिफ वॉर सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारी पडताना दिसत आहे, ट्रम्प यांनी भारताप्रमाणेच चीन, आणि इतर अनेक देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे अनेक देशांसोबत अमेरिकेचे संबंध खराब झाले आहेत. टॅरिफमुळे अनेक देश नाराज असून अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये मोठी दरार निर्माण झाली आहे.
आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ब्राझीलचे राष्ट्रपती लुई ननाशियो लुला डा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगीतलं आहे की, अमेरिकेसोबत आमचा कुठलाही संबंध नाही. ते आमच्यावर टॅरिफ लावून राजकीय शत्रूत्व जोपासत आहेत, असंही यावेळी ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे भारताप्रमाणेच अमेरिकेनं ब्राझीलवर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे.
बीबीस वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिल्वा यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेनं आमच्यावर टॅरिफ लावला आहे, मात्र यामध्ये त्यांचंच मोठं नुकसान आहे. टॅरिफमुळे अमेरिकन लोकांना मांस आणि कॉफी सारख्या ब्राझीलमधून येणाऱ्या उत्पादनासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ट्रम्प हे ब्राझील सोबत चुकीचा व्यवहार करत आहेत, त्याची किंमत ही अमेरिकेमधील लोकांना मोजावी लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. दरम्यान पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, मी कधीही डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, मी त्यांना कधीही कॉल केला नाही, कारण माझी त्यांना कॉल करण्याची इच्छा देखील नव्हती.
ब्राझीलच्या राष्ट्रपतींना एवढा राग का?
याबाबत दावा करताना लुई ननाशियो लुला डा सिल्वा यांनी असा दावा केला की, आमच्यावर टॅरिफ लावण्यात आला आहे हे मला वृत्तपत्राद्वारे कळालं, ट्रम्प यांनी ट्विट करत ब्राझीलवर टॅरिफ लावत असल्याची घोषणा केली, मात्र हा संवादाचा अत्यंत चुकीचा मार्ग आहे, त्यामुळे आता अमेरिकेसोबत आमचा काहीही संबंध नाही, असं सिल्वा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ब्राझील आणि अमेरिकेमधील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.
