AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका, उरल्या सुरल्या आशेवरही फिरलं ‘पाणी’, ज्याच्या भरोशावर बसला त्यानेच..

भारत आणि पाकिस्तानमधील तणावर वाढला आहे, या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानला आता आणखी एक धक्का बसला आहे.

पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका, उरल्या सुरल्या आशेवरही फिरलं 'पाणी', ज्याच्या भरोशावर बसला त्यानेच..
| Updated on: May 09, 2025 | 9:31 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्ताविरोधात मोठी कारवाई केली, भारतानं या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात आधी सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती दिली, त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली. आयात, निर्यात पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

दरम्यान सिंधू नदीच्या जल वाटप कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला होता. पाकिस्तानकडून इशाराही देण्यात आला, मात्र भारतानं पाकिस्तानच्या इशाऱ्याला जुमानलं नाही, त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली, त्यानंतर पाकिस्तानला असं वाटत होतं की भारताच्या या निर्णयामध्ये वर्ल्ड बँक हस्तक्षेप करेल, मात्र आता पाकिस्तानच्या या आशेवर देखील पाणी फिरलं आहे. जागतिक बँकेनं पाकिस्तानला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

जागतिक बँकेनं या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं आहे की, आम्ही भारताला निर्णय घेण्यापासून रोखू शकत नाही, या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे आम्ही या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करणार नाहीत, वर्ल्ड बँकेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान त्यानंतर भारताकडून पाकिस्तामध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतानं पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करून टाकली, मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, गुरुवारी देखील पाकिस्तानकडून भारताच्या सिमावर्ती भागात हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा हल्ला भारतानं परतून लावला आहे. भारतानं पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडले आहेत. अनेक ड्रोन देखील पाडण्यात आले आहेत. तरी देखील पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार सुरूच आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...