AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठा धक्का

Paytm Bank : डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या कंपनी पेटीएमवर नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीला कोणताही नवीन ग्राहक जोडता येणार आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Paytm कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मोठा धक्का
| Updated on: Jan 31, 2024 | 6:47 PM
Share

Paytm bank : ऑनलाइन सेवा देणाऱ्या पेटीएम कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) मोठा धक्का बसला आहे. बुधवारी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा देणाऱ्या पेटीएम या कंपनीला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कंपनीचा नवीन ग्राहक PPBL मध्ये सामील होऊ शकणार नाही. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

पेटीएम पेमेंट बँकेवर नवीन ग्राहक जोडण्याबाबत निर्बंध तर लादण्यात आलेच आहेत. पण आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेटमध्ये आणि फास्टॅगमध्ये ठेवी/टॉप-अप करण्याची परवानगी दिली जाणार नाही नसल्याचे देखील म्हटले आहे.

बँकेच्या म्हणण्यानुसार आता ग्राहकांना बचत खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स, फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)  खात्यांमधून कोणत्याही निर्बंधाशिवाय पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा पैसा परत मिळणार आहे. यावर कोणतेही निर्बंध नसणार आहे. असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. RBI ने बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट-1949 च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम  पेमेंट्स बँकेवर कारवाई केलीये.

RBI ने पेटीएम वर का केली कारवाई?

पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईबाबत म्हटले आहे की, लेखापरीक्षण अहवालात पेटीएमच्या बँकिंग सेवेत काही चुकीचे व्यवहार आढळले असून नियमांचं पालन केले नसल्याने ही कारवाई करण्यात आलीये. त्यामुळे पेटीएम बँकेंच्या नवीन ग्राहक जोडणी बंदी घातली गेली आहे. सध्याच्या ग्राहकांच्या खात्यातील व्यवहारांवर 29 फेब्रुवारी 2024 पासून बंदी घालण्यात आली आहे.

पेटीएम शेअर्सवर होणार परिणाम

रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पेटीएमच्या शेअर्सवर देखील त्याचा परिणाम दिसून येईल. याआधीही कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण पाहायला मिळाली होती. लहान पोस्टपेड कर्जे कमी करण्यासाठी पेटीएम पेमेंट बँकेची योजना असल्याचे यामागील कारण सांगितले जात आहे.

कंपनीच्या बैठकीत, लहान पोस्टपेड कर्ज देण्यापेक्षा मोठी वैयक्तिक कर्ज देण्यावर भर देण्यात आला होता. पण, ब्रोकरेज हाऊसना कंपनीची ही योजना आवडली नाही. त्यांनी कंपनीच्या महसुलाच्या अंदाजात कपात केली. आता पेटीएमवरील आरबीआयच्या या आदेशाचा वाईट परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसू शकतो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.