नवं सरकार येताच मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रुपये

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती.

नवं सरकार येताच मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना मिळणार 2500 रुपये
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 9:49 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबी बवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. दरम्यान या योजेनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली तर महायुतीच्या नेत्यांनी देखील विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान आमचं सरकार जर परत आलं तर या योजनेच्या रकमेमध्ये वाढ करून आम्ही लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा करून अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर महाविकास आघाडीकडून महिलांना तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्ये देखील अशीच योजना सुरू करण्यात आली आहे. जीचं नाव मंईयां सम्मान योजना असं आहे.हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री होताच या योजेतून मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता झारखंडमधील महिलांना दर महिन्याला 2500 रुपये मिळणार आहे. त्यामुळे येथील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून, या योजनेचं स्वागत होताना दिसत आहे.

झारखंडमध्ये पुन्हा एकदा हेमंत सोरेन यांचा पक्ष सत्तेत आला आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 14 मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.रांचीच्या मोरहाबादी मैदानात शपथग्रहन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये आश्वासन पूर्तीचा धडका लावला आहे.मंईयां सम्मान योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2500 रुपये जमा करण्यात येतील असं अश्वासन हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं.त्यानंतर नवं सरकार सत्तेत येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आता या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2500 हजार रुपये जमा होणार आहेत.

'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुती 2.0 राज्यात आता फडणवीस 'सरकार',तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ.
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ
शपथविधीच्या 3 तासांआधी सस्पेन्स, अखेर शिंदेंनी घेतली DCM पदाची शपथ.
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री
लाल पागोटं, गुलाबी शेला अन् दादांनी रेकॉर्ड केला; 6 वेळा उपमुख्यमंत्री.
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
बाबासाहेबांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन, चैत्यभूमीवर भीमसागर उसळला.