AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!

पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरी अथवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवर आपल्या हालचाल वाढवल्या आहेत. याचा परिणाम थेट पाकिस्तानमध्येही दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली असून 4 दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळत आहे.

भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानला 4 दिवसात 2100 कोटींचं नुकसान!
| Updated on: Aug 05, 2019 | 12:01 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरी अथवा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या पश्चिम सीमेवर आपल्या हालचाल वाढवल्या आहेत. याचा परिणाम थेट पाकिस्तानमध्येही दिसण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय सैन्याच्या हालचालींनी पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण झाली असून 4 दिवसांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळत आहे. त्यामुळं पाकिस्तानी गुंतवणुकदारांचे 2100 कोटी रुपये बुडाल्याचं सांगितलं जातं आहे. पाक शेअर बाजार सातत्यानं कोसळत असल्यानं पाकिस्तानचा ‘प्रमुख बेंचमार्क इंडेक्स केएसई’ मागील 100 वर्षातील निच्चांकी स्तरावर आला आहे.

पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर भारतानं पश्चिम सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे, तर पश्चिम सीमेवरच्या सर्वच भागात भारताकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतानं पाकिस्तानच्या सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे.

‘पाकिस्तानच्या कुरघोड्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची तयारी पूर्ण’

लष्करी तळ, विमानतळ अशा सर्वच भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सैन्याने पाकिस्तानच्या कुरघोड्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून जम्मू-कश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या BAT अर्थात बॉर्डर अॅक्शन टीमकडून केलेल्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 5 ते 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यानंतर रविवारी पाकिस्तानला  संबंधित मृत दहशतवाद्यांचे मृतदेह नेण्यासाठी प्रस्तावही देण्यात आला.

‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची ट्रम्प यांच्या मध्यस्थीची मागणी’

या संपूर्ण प्रकरणानंतर पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. या घटनेनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तात्काळ राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. तसंच भारतानं सीमेवर क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला. तसंच पुन्हा एकदा इम्रान यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा उल्लेख केला. इम्रान खान म्हणाले, “अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांना काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता. आता ती वेळ आली आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक कारवाईमुळे नियंत्रण रेषेवरची स्थिती बिगडत जाते आहे.

7 ऑगस्टपासून सीमा भागात बीएसएफची मोहिम

पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे पाकिस्तानचे दहशतवादी भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारतीय सैन्याला हायअलर्ट देण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पश्चिम सीमेवर सुरक्षा मोहिम राबवली जाणार आहे. 7 ऑगस्टपासून बीएसएफच्यावतीनं ऑपरेशन अलर्ट एक्सरसाईज सुरु केली जाईल. 21 ऑगस्टपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. या दरम्यान जम्मू ते गुजरातपर्यंत सीमावर्ती भागात ही मोहिम सुरू राहिल. यात सीमा सुरक्षा दलाचे सर्व अधिकारी आणि जवान सहभागी होती.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची नाकाबंदी

15 ऑगस्टच्या निमित्तानं दहशतवादी कारवाईची शक्यता आहे. त्यामुळं भारतानं सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी केला आहे. भारताच्या या कृतीनं पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळं भारताच्या आक्रमक कृतीनं घाबरलेला पाकिस्तान पुढे काय करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण, सध्या तरी भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांची सर्व सीमांवर नाकाबंदी करण्याचं ठरवलं आहे, असं स्पष्ट दिसतं आहे.

अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यात काश्मीर खोऱ्यातील पर्यटक आणि यात्रेकरुंना सोमवारपर्यंत काश्मीर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव सुरू झाल्यानं खळबळ उडाली. काश्मीरमधील हालचाली आणि दिल्लीतील घटनाक्रम यामुळं आता सोमवारी काश्मीरप्रश्नी नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सैनिकांची जमवाजमव करण्यात येते आहे. आधीच दहशतवादी कारवाईची शंका उपस्थित करत अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर आता पर्यटक आणि यात्रेकरुंसह काश्मीर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक क्रिकेटर इरफान पठाणलाही काश्मीर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता नव्यानं जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात सैनिक उतरवण्यात आले आहे. आधीच काश्मिरमध्ये 1 लाख सैनिक तैनात आहेत. अमरनाथ यात्रेकरुंसाठी 45 हजार जवान तैनात होते. गेल्या आठवड्यातच निमलष्करी दलाचे 10 हजार जवान काश्मीर खोऱ्यात आले आहेत. त्यात आणखी 25 हजार जवानांना काश्मीर खोऱ्यात बोलावण्यात आलं आहे.

काश्मीर खोऱ्यात सैन्याची जमवाजमव का ?

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैनिकांना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्यानं सरकारला नेमकं काय करायचं आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दिल्लीतील हालचालींनाही वेग आला आहे. त्यातच दिल्लीतही रविवारी काश्मीर संदर्भात वेगवान हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळालं. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात गृहमंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव राजीव गाबा हे उपस्थित होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात मोदी सरकार काश्मीरप्रश्नी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनंच काश्मीरमध्ये सैन्याची जमवाजमव सुरू आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

काश्मीरचे राजकीय नेते संभ्रमात

दुसरीकडे काश्मीरमधील हालचालींमुळे राजकीय नेत्यांमध्ये मात्र संभ्रमाचं वातावरण कायम असल्याचं चित्रं आहे. याच पार्श्वभूमीवर आज (रविवारी) पुन्हा एकदा मेहबुबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. काश्मीर आणि दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींमुळे काश्मीर प्रश्नी काहीतरी महत्वाचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आता सोमवारी मोदी सरकार नेमकी काय घोषणा करतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.