Bihar Election Result : भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

भाजप हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असेलेला जेडीयू बराच पिछाडीवर आहे (Bihar Assembly Election Result 2020).

Bihar Election Result : भाजपचे नित्यानंद राय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत, नितीश कुमार केंद्रात जाणार?

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Assembly Election Result 2020) आज (10 नोव्हेंबर) रात्री उशिरापर्यंत समोर येईल. सध्या मतमोजनी सुरु आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये भाजप सर्वात पुढे असल्याचं समोर येत आहे. भाजप जवळपास 73 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचा मित्रपक्ष जेडीयू 50 जागांवर आघाडीवर आहे.

जेडीयूला 2015 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असेलेला जेडीयू बराच पिछाडीवर आहे. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा हक्क जास्त असेल (Bihar Assembly Election Result 2020).

बिहारमध्ये एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर भाजप नेते नित्यानंद राय हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर आहे. नित्यानंद राय हे केंद्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जूनियर मंत्री आहेत. ते गृह राज्यमंत्री आहे. भाजपचा नित्यानंद यांच्यावर सुरुवातीपासूनच विश्वास आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना गृह राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

नित्यानंद राय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीआधी भाजपच्या नव्या टीमची घोषणा केली होती. यामध्ये संजय जयस्वाल आणि भूपेंद्र यादव यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांसोबत नित्यानंद यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे एनडीएचं सरकार स्थापन होत असेल आणि भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं तर नित्यानंद यांचं नाव जवळपास निश्चित असण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांना केंद्रात पाठवणार?

बिहारमध्ये गेल्या 15 वर्षांपासून जेडीयूचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. ते सध्या एनडीएचे अविभाज्य घटक आहेत, म्हणजेच बिहारमधील भाजपचे घनिष्ठ मित्र आहेत. मात्र, बिहारच्या जनतेला आता मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार नको, पण एनडीएचं सरकार हवं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता फारसी कमी आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली होती. नितीश कुमार यांनी केंद्रात जायला हवं आणि एनडीएकडून दुसऱ्या कुणाला मुख्यमंत्रीपदाची संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले होते. अश्विनी चौबे यांनी हे त्यांचं वैयक्तित मत असल्याचं म्हटलं होतं. पण आता जसजसा निकाल समोर येत आहे, तसतसं नितीश कुमार यांचं केंद्रात जाण्याबाबत्या चर्चा वाढू लागल्या आहेत.

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनीदेखील अशाचप्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये पंतप्रधान मोदींचा विजय होणार आहे, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या बोलण्यावरुन बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा मोदींचा करिश्मा जास्त चालला, असं त्यांना म्हणायचं असल्याचं स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या :

ओवेसी फॅक्टरने समीकरणच बदलले, 11 जागांवर NDA ची घोडदौड

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर

भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

Published On - 4:13 pm, Tue, 10 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI