AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar election result 2025 : काँग्रेसमुळे आरजेडी सुद्धा बुडाली, अशी दोस्ती काय उपयोगाची?

Bihar election result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. पुन्हा एकदा नितीश बाबूच सत्तेवर येणार हे दिसतय. 20 वर्षानंतरही जेडीयूचा जनाधार घटण्याऐवजी वाढला आहे. देशातील हे एक वेगळं राजकीय चित्र आहे. भाजप सुद्धा तितकाच मजबुतीने जेडीयूसोबत आहे.

Bihar election result 2025 : काँग्रेसमुळे आरजेडी सुद्धा बुडाली, अशी दोस्ती काय उपयोगाची?
Tejasvi Yadav-Rahul Gandhi
| Updated on: Nov 14, 2025 | 10:45 AM
Share

देशात किंवा कुठल्याही राज्यात एखाद सरकार सत्तेवर असेल, तर पाच वर्षानंतर त्या सरकार विरोधात एक लाट असते. प्रस्थापित सरकार विरोधी लाट त्याला म्हणतात. अँटी इन्कमबंसी फॅक्टर असतो. पण भाजपचं ज्या-ज्या राज्यात सरकार आहे, तिथे मात्र या उलट ट्रेंड दिसून येतोय. पाच-दहा वर्षानंतरही भाजप त्यांचं शासन असलेल्या राज्यांमध्ये सरकार टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतोय. भाजपला ही कला चांगल्या पद्धतीने जमली आहे. भाजपची सरकारं 15-20 वर्षानंतरही कायम राहत असताना त्या राज्यात विरोधी पक्ष मात्र कमकुवत होतोय. महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्येही तोच ट्रेंड दिसतोय. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA च सरकार येण्याची चिन्ह आहेत.

सध्याचे जे ट्रेंड आहेत त्यानुसार एनडीए 161 आणि महाआघाडी 77 जागांवर आघाडीवर आहे. हा मोठा फरक आहे. मूळात म्हणजे नितीश कुमार हे 20 वर्षांपासून मुख्यमंत्री पदावर आहेत. आताही मुख्यमंत्री पदासाठी भाजपने त्यांचाच चेहरा पुढे केला आहे. बिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. सामान्यत: जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होतं, ते सत्ता उलथवण्यासाठी असतं. पण बिहारमध्ये मात्र उलटं घडतय. हे वाढलेले मतदान नितीश कुमार आणि भाजपची सत्ता टिकवण्यासाठी आहे. हा मोठा फरक आहे.

एनडीएमध्ये तुल्यबळ दोस्ती

महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यात आले. त्याचा हा परिणाम आहे हे मान्य आहे. कारण यावेळी महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त आहे. पण 20 वर्षानंतरही सरकार विरोधात जनमत बनवता येत नाही, हे विरोधी पक्षांच मोठ अपयश आहे. खासकरुन काँग्रेसची साथ राष्ट्रीय जनता दलासाठी काही फायद्याची नाहीय. याउलट एनडीएमध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड यांची दोस्ती तुल्यबळ आहे. दोघांमधील आघाडीवर असलेल्या जागांच अंतर फार कमी आहे. काँग्रेसमुळे आरजेडीचा फायदा कमी नुकसान जास्त

याउलट आरजेडी 50 पेक्षा जास्त तर काँग्रेसच्या जागांचा आकडा 10 च्या आत आहे. म्हणजे आरजेडी सोबत नसेल तर काँग्रेसची अवस्था यापेक्षा वाईट होऊ शकते. आघाडीमध्ये तुल्यबळ पार्टनर नसेल, एकटा खेळून किती खेळणार असा प्रश्न निर्माण होतो. उलट काँग्रेसमुळे आरजेडीचा फायदा कमी नुकसान जास्त होतय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.