Bihar Election 2020: काँग्रेसच्या महाआघाडीकडून 243 जागांवरील उमेदवारांची घोषणा, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलालाही संधी

Bihar Election 2020: काँग्रेसच्या महाआघाडीकडून 243 जागांवरील उमेदवारांची घोषणा, शत्रुघ्न सिन्हांच्या मुलालाही संधी

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने सर्वच्या सर्व 243 जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 15, 2020 | 10:16 PM

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीने सर्वच्या सर्व 243 जागांवरील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत राजद, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची महाआघाडी आहे. हे सर्व पक्ष एकत्रितपणे भाजप आणि संयुक्त जनता दलाला आव्हान देतील (Bihar Eletions 2020 Mahagathbandhan of RJD Congress left parties list of 243 candidates).

जागावाटपाच्या सुत्रानुसार, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) 144 जागा, काँग्रेसला 70 जागा आणि डाव्या पक्षांना 29 जागा मिळाल्या आहेत.

याआधी काँग्रेसने आपल्या 49 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यात बांकीपूर येथून ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा यांना तिकिट देण्यात आलं आहे. बिहारगंज येथून सुहासीनी यादव यांना तिकिट देण्यात आलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यातील 3 नोव्हेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाआघाडीसोबतच एनडीएने देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. यानुसार जेडीयू 122 आणि भाजप 121 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपने आपल्या कोट्यातील 11 जागा मुकेश सहनी यांच्या व्हीआयपी पक्षाला, तर जेडीयूने जीतन राम मांझी यांच्या पक्षाला 7 जागा दिल्या आहेत.

हेही वाचा :

Bihar Election | शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं

‘मुंबई में बत्ती गुल बा, बिहार में लाइट फुल बा’; नितीशकुमारांच्या रॅलीत घोषणा

…म्हणून बिहारच्या या गावात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला ‘नो एन्ट्री’!

नितीश कुमारांना रोखण्यासाठीच भाजपकडून चिराग पासवानचा वापर- तारिक अन्वर

Bihar Eletions 2020 Mahagathbandhan of RJD Congress left parties list of 243 candidates

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें