दोन पत्नींमध्ये वाटला गेला पती, एकीकडे तीन दिवस, दुसरीकडे तीन दिवस, एक दिवस वीकेंड सुट्टी
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील हा प्रकार आहे. पूर्णियामधील रुपौली पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. या पोलीस ठाण्यातंर्गत एका व्यक्तीने सात वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. परंतु या लग्नाबाबत त्याने पहिल्या पत्नीला काहीच सांगितले नव्हते.

पहिल्या पत्नीस न सांगता दुसरे लग्न करणे एका पतीला चांगलेच अडचणीत आणले. एका पतीला पहिल्या पत्नीपासून दोन मुले झाले होते. जेव्हा पहिल्या पत्नीला दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली, तिने थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी परिवाराशी चर्चा करुन अनोखे समेट घडवून आणले. पोलिसांनी पतीच्या सात दिवसांची विभागणी केली. पहिल्या पत्नीकडे तीन दिवस दिले तर दुसऱ्या पत्नीकडे तीन दिवस दिले. त्यानंतर एक दिवस साप्ताहिक सुट्टी दिली. पूर्णिमाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी असा तोडगा या प्रकरणात काढला. एखाद्या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे हा प्रकार घडला आहे.
काय आहे प्रकरण
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील हा प्रकार आहे. पूर्णियामधील रुपौली पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. या पोलीस ठाण्यातंर्गत एका व्यक्तीने सात वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. परंतु या लग्नाबाबत त्याने पहिल्या पत्नीला काहीच सांगितले नव्हते. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. हा प्रकार पहिल्या पत्नीवर समजल्यावर तिने पूर्णिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्याकडे तक्रार केली. पोलिसांच्या परिवार सल्लागार केंद्राकडे हे प्रकरण दिले गेले. त्यावेळी पत्नीने आपली चूक कबूल केली.
पतीने परिवार सल्लागार केंद्राच्या सदस्यांना सांगितले, मला पहिल्या पत्नीकडे आणि मुलांकडे जायचे आहे. परंतु दुसरी पत्नी जाऊ देत नाही. त्याला दुसऱ्या पत्नीपासूनही मुले झाली आहेत. पहिल्या पत्नीकडे गेल्यावर दुसरी पत्नी धमकी देते. दोन्ही पत्नींच्या भांडणामुळे आपण अडचणीत आलो आहोत, असे त्या पतीने सांगितले.




असा काढला मार्ग
परिवार सल्लागार केंद्राने या प्रकरणात अनोखा मार्ग काढला. पहिल्या पत्नीसोबत चार दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत तीन दिवस पती राहणार असल्याचे सांगितले. त्यावर दुसऱ्या पत्नीने हरकत घेतली. दुसऱ्या पत्नीने या निर्णयास विरोध करत खूप गोंधळ घातला. अखेर दोन्ही पत्नीमध्ये आठवड्यातील तीन-तीन दिवस पतीची वाटणी करण्यात आली. आठवड्यातील पहिले तीन दिवस पहिल्या पत्नीकडे त्यानंतरचे तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पती राहणार आहे.
मग त्या एका दिवसाचे काय?
तीन-तीन दिवसांची वाटणी दोन्ही पत्नीमध्ये झाली. मग आठवड्यातील राहिलेला एक दिवस पतीचा असणार आहे. तो या दिवशी आपल्या मर्जीप्रमाणे काहीही करु शकतो. म्हणजेच हा दिवस त्याचा सुट्टीचा दिवस असणार आहे. तसेच पहिल्या पत्नीला मुलांचे शिक्षणासाठी दर महिन्याला चार हजार रुपये देण्याचे आदेश परिवार सल्लागार केंद्राने दिले.