भाजप आमच्या भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते, निष्ठावंतांना नाही: ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. | Mamata Banerjee

भाजप आमच्या भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते, निष्ठावंतांना नाही: ममता बॅनर्जी

कोलकाता: भाजप तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जाणार नाहीत, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी केले. तृणमूल काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे ज्यांना आमच्या पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी तातडीने निघावे, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले. (Mamata Banerjee slams BJP)

पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेस खिळखिळी होताना दिसत आहे.

ममतादीदींना झटका, आणखी एक आमदार भाजपमध्ये; आतापर्यंत 11 नेत्यांची टीएमसीला सोडचिठ्ठी

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

दीपक हल्दर हे डायमंड हार्बर येथील आमदार आहेत. त्यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत कुरबुरीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हल्दर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच आमदार असतानाही सत्ताधारी पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये येत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

46 दिवसात 11 नेते बाहेर

हल्दर यांच्यामुळे टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या 11 झाली आहे. गेल्या 46 दिवसात 11 नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहेत. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यावेळीही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे.

युवा मोर्चा अध्यक्षही भाजपमध्ये येणार?

टीएमसीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष हिरेन चॅटर्जी हे सुद्धा भाजपमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना हिरेन चॅटर्जी यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. टीएमसीने केवळ आपला वापर केलाय, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे तेही भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्रीजी, तुम्ही दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांसोबत असायला हवं, आपच्या खासदाराचा सवाल

एमपी गजब है! ‘गोमूत्र फिनाईल’नेच ऑफिस साफ करण्याचा आदेश! बाबू लोकांसमोर धर्मसंकट

ममतांच्या पोस्टरवरील गुटख्याची पिचकारी भाजप नेत्यानं पुसली, काट्याची टक्कर असलेल्या बंगालमध्ये दिलासादायक चित्र

(Mamata Banerjee slams BJP)

Published On - 4:49 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI