AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल’, काँग्रेसचं थेट गृहमंत्र्यांना पत्र नेमकं प्रकरण काय?

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे.

'राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल', काँग्रेसचं थेट गृहमंत्र्यांना पत्र नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2025 | 8:22 PM
Share

विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवर आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात आता काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. या प्रकरणात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

केरळच्या एका न्यूज चॅनलवर लडाखमध्ये उफाळलेल्या हिंसाचारावर चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात भाजपची बाजू मांडताना एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष पिंटू महादेव यांनी म्हटलं की, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना गोळी मारली जाईल. पिंटू महादेव हे अनेक चॅनलवर भाजपची बाजू मांडताना दिसतात.

काँग्रेसचं अमित शाह यांना पत्र

या प्रकरणाची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाळ यांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. सुरुवातीला तुम्ही राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरून त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, आता तर तुम्ही त्यांना गोळी मारण्याची भाषा करत आहात, असं या पत्रात वेणुगोपाळ यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पत्रात पुढे असं देखील म्हटलं आहे की, राहुल गांधी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची आधीच हत्या झाली आहे. गांधी कुटुंबाने आपल्या घरातील दोन व्यक्तींना गमावलं आहे. हे पत्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं असून, ते अनेक नेत्यांना टॅग देखील करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राहुल गांधी यांना मिळालेल्या धमकीवरून सुप्रिया श्रीनेत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. मला राहुल गांधी यांच्या सुरक्षेची चिंता होत आहे. मला वाटतं त्यांना धोका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?