उत्तर प्रदेश : भदोहीमध्ये भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येमुळे खळबळ, अनेक जण अटकेत

भदोहीच्या सुरियावा पोलीस स्टेशन परिसरातील गल्हैया गावातील ही घटना आहे. भाजपचे मंडल सरचिटणीस मुकेश सिंह यांचे पुतणे विशाल सिंह यांची येथे हत्या करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश : भदोहीमध्ये भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येमुळे खळबळ, अनेक जण अटकेत
संग्रहित छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Oct 06, 2021 | 9:55 PM

भदोही : उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा काही लोकांनी भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भाजप नेत्याच्या पुतण्याचा मृत्यू झाला आहे. या हत्येमुळे उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून आणि जुन्या वैमनस्यातून 6 जणांनी मिळून ही हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले असून, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. (BJP leader’s nephew’s murder in Bhadohi Uttar Pradesh, many arrested)

नातेवाईकांनी साथीदाराच्या मदतीने केली हत्या

भदोहीच्या सुरियावा पोलीस स्टेशन परिसरातील गल्हैया गावातील ही घटना आहे. भाजपचे मंडल सरचिटणीस मुकेश सिंह यांचे पुतणे विशाल सिंह यांची येथे हत्या करण्यात आली आहे. असे म्हटले जाते की, विशाल रात्री उशिरा शौचासाठी घराबाहेर गेला होता, तेव्हा त्याच्या काही नातेवाईकांनी त्याच्या काही साथीदारांसह त्याला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्यावर रॅगने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच नातेवाईकांनी जखमी विशाल सिंहला जिल्हा रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले.

संशयित आरोपींची चौकशी सुरु

मृताचे काका आणि भाजपचे मंडल सरचिटणीस मुकेश यांनी सांगितले की, 2013 मध्येही मृताच्या वडिलांवर गोळी झाडण्यात आली होती, ज्यामध्ये तो वाचला होता. गोळी भिंतीला लागली होती. त्याने आरोप केला आहे की, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या काही साथीदारांसह मिळून ही हत्या केली आहे. तसेच, पोलीस अधीक्षक डॉ.अनिलकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक संशयित लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

बिहारमध्ये संतापजनक व्हिडिओ व्हायरल

बिहारच्या छपरा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. छपरा येथील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. संबंधित व्हिडीओत काही नराधम एका महिलेला छळत आहेत. महिला दुचाकीवर मागच्या सीटवर बसली आहे. यावेळी आरोपी तिला छळण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हे संतापजनक कृत्य करत असताना आरोपींपैकी एकाने या विकृत चाळ्यांचा व्हिडीओ देखील बनवला आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित घटना ही दरियापूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. ही घटना खरंतर दोन आठवड्यांपूर्वीची आहे. काही नराधमांनी पीडित महिलेला एका पुरुषासोबत जंगलात बघितलं होतं. तिथे आरोपींनी त्यांना घेरत त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं. आरोपींनी त्यांना मारहाणही केली. यादरम्यान पीडित महिला आणि पुरुष हे कसंतरी आरोपींच्या तावडीतून सुटले आणि दुचाकीने जाऊ लागले. यावेळी सुद्धा आरोपींनी अश्लील कृत्य केलं. (BJP leader’s nephew’s murder in Bhadohi Uttar Pradesh, many arrested)

इतर बातम्या

VIDEO: फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबत डान्स, पंजाबी गाण्यावर थिरकली दोघांची जोडी

Maharashtra Cabinet Decision : संरक्षण विभागास राज्य शासनाची जमीन पुणे मेट्रोसाठी वापर करण्यास मान्यता

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें