भाजपच्या नेत्याचं भाषण सुरू होतं… अचानक हल्ला झाला, कोणीच वाचलं नसतं… मधमाशांचं टोळकं… नेमकं काय घडलं?
Honey Bees : देवरिया येथील रवींद्र किशोर शाही स्टेडियममध्ये संसदीय क्रीडा स्पर्धा सुरू होती. 25 डिसेंबरला या क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. या समारोपाच्या कार्यक्रमात भाजप नेत्यावर हल्ला झाला आहे.

उत्तर प्रदेशातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देवरिया येथील रवींद्र किशोर शाही स्टेडियममध्ये संसदीय क्रीडा स्पर्धा सुरू होती. 25 डिसेंबरला या क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. या समारोपाच्या कार्यक्रमात देवरिया येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार शशांक मणी त्रिपाठी स्टेजवरून खेळाडूंना संबोधित करत होते. मात्र त्यावेळी अचानक असं काही झाली की सर्वांची भंबेरी उडाली. देवरिया मध्ये नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खासदार शशांक मणी त्रिपाठी यांच्यावर मधमाश्यांचा हल्ला
भाजपचे खासदार शशांक मणी त्रिपाठी भाषण करत असताना अचानक मधमाश्यांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र या हल्ल्याला न घाबरता त्रिपाठी यांनी भाषण सुरू ठेवले आणि काही वेळानंतर आपले भाषण संपवले. त्यानंतर ते खाली बसले. यानंतर स्टेजवर बसलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष सहजानंद राय यांनी त्रिपाठी यांचे कौतुक केले. त्यानंतर खासदार त्रिपाठी यांना कार्यकर्त्यांसोबत 100 मीटर धावत जावे लागले.
रवींद्र किशोर शाही स्टेडियममध्ये संसदीय क्रीडा स्पर्धेचा समारोप
रवींद्र किशोर शाही स्टेडियममध्ये 21 डिसेंबरपासून संसदीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धेची सांगता झाली. यावेळी विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सांगता समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खासदार त्रिपाठी यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान
या स्पर्धेच्या समोरोपाच्या कार्यक्रमात खासदार त्रिपाठी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंतर केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, खेळ हे तरुणांच्या लपलेल्या प्रतिभेला वाव देण्याची संधी प्रदान करतात. खेळ हे केवळ शारीरिक विकासाचे साधन नाही तर शिस्त, संघ भावना आणि सकारात्मक विचारसरणीचे एक अद्वितीय साधन देखील आहे.
याआधीही अनेकदा मधमाशांचा हल्ला
दरम्यान, उत्तर प्रदेशात मधमाश्यांच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही राज्याच्या वेगवेगळ्या भारातून मधमाश्यांच्या हल्ल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र खासदार त्रिपाठी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे ही घटना जास्त चर्चेचा विषय बनली आहे.
