AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National President : कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? भाजपमध्ये मोठी खलबतं; 17 ऑगस्ट रोजी होईल घोषणा

BJP National President : भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन सध्या खल सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. ओबीसी अथवा एखाद्या महिलेला या पदावर बसविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय सुरू आहेत खलबतं?

National President : कोण होणार राष्ट्रीय अध्यक्ष? भाजपमध्ये मोठी खलबतं; 17 ऑगस्ट रोजी होईल घोषणा
कोण होणार भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष
Updated on: Aug 15, 2024 | 10:03 AM
Share

भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यावर सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. तर पक्षातंर्गत मोठा खल सुरू आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेत यातील काही राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संघटनात्मक बदलावर भर देण्यात येणार आहे. तळागाळातील नेत्याला वरिष्ठ पदावर बसवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. ओबीसी अथवा महिलेच्या हाती पक्षाची कमान देण्यावर पण भर देण्यात येत आहे.

शनिवारी बैठकीत चिंतन

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक होत आहे. त्यात विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होईल. संघटनात्मक निवडणुकांना या बैठकीत अंतिम रुप देण्यात येईल. या बैठकीत आगामी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही, पण बैठकीच्या अखेरीस केंद्रीय नेतृत्व नवीन अध्यक्ष पदाविषयी मोठी घोषणा करू शकते.

लोकसभा निवडणुकीनंतर पहिली बैठक

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही पहिली बैठक आहे. यामध्ये राष्ट्रीय पदाधिकारी, राज्याचे अध्यक्ष, संघटन मंत्री आणि राज्यातील प्रभारी, सह प्रभारी सहभागी होतील. या एक दिवशीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि अमित शाह हे पण बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बैठकीत मुख्य विषय हा संघटनात्मक धोरणांचा असेल. यामध्ये सदस्यता अभियान, तर स्थानिक ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंतच्या निवडणुकांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतील. याच दरम्यान चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पण आहेत. त्यामुळे राज्य अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांशी या राज्यातील घडामोडींविषयी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा होऊन रणनीती आखण्यात येऊ शकते.

तळागाळातील कार्यकर्त्याचा शोध

या वृत्तानुसार, भाजपला पुढील अध्यक्षपदासाठी संघाच्या सहमतीची गरज आहे. अनेक मोठ्या नेत्यांना भाजपने विविध महत्वाच्या पदावर स्थान दिले आहे. त्यामुळे आता भाजप आणि संघ अध्यक्षपदासाठी तळागाळाशी नाळ असलेल्या नेत्याच्या शोधात आहे. अर्थात अजून याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी महिला अथवा ओबीसी यांच्या हातात पक्षाची कमान देण्याचा प्रयत्न राहील. भाजपने अद्याप पक्षाची कमान महिलेच्या हाती दिलेली नाही.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.