AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आक्रोश आणि मातम… मोहरमच्या मिरवणुकीतील ताबूत हायटेंशन वायरच्या संपर्कात; चौघांचा जागीच मृत्यू, 9 जण गंभीर

बोकारो येथे मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. येथील हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने एकूण 13 गंभीररित्या भाजले, त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आक्रोश आणि मातम... मोहरमच्या मिरवणुकीतील ताबूत हायटेंशन वायरच्या संपर्कात; चौघांचा जागीच मृत्यू, 9 जण गंभीर
| Updated on: Jul 29, 2023 | 10:20 AM
Share

Bokaro Muharram Incident : झारखंडमधील बोकारो (Bokaro) येथे मोहरमच्या (Muharram) मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. येथे हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने एकूण 13 गंभीररित्या भाजले असून त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. उर्वरित 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ च्या सुमारास बोकारोच्या बर्मो भागातील शेतात ही दुर्घटना घडली. मोहरममध्ये सर्वजण ताजिया घेऊन जात असताना 11000 व्होल्टच्या वायरच्या कचाट्यात अडकले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलत असताना वरून जाणारी 11,000 ची हायटेंशन लाईन ताजियामध्ये अडकली, त्यामुळे ताजियाच्या मिरवणुकीत ठेवलेल्या बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे अनेक लोक गंभीररित्या होरपळले. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने डीव्हीसी बोकारो थर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या चौघांचा मृत्यू झाला असून इतर नऊ जखमींची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. तसेच यावेळी रुग्णालयात रूग्णवाहिका नसल्याने आणि रूग्णालयातील एकंदर गलथान कारभारामुळे लोकांनी एकच गोंधळ घातला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल