Boris Johnson India visit cancel : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय

ब्रिटनचे पंतप्रधान रविवारपासून भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर येणार होते. पण दिल्लीसह भारतातील अनेक राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे जॉन्सन यांचा भारत दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:44 PM, 19 Apr 2021
Boris Johnson India visit cancel : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

नवी दिल्ली : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांचा भारत दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. या आठवड्यात जॉन्सन भारत दौऱ्यावर येणार होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राजधानी दिल्लीमध्ये आठवड्याभराचा लॉकडाऊन (Delhi Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. आज रात्री 10 पासून दिल्लीमध्ये लॉकडाऊन असणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान रविवारपासून भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यावर येणार होते. पण दिल्लीसह भारतातील अनेक राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे जॉन्सन यांचा भारत दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. (British Prime Minister Boris Johnson’s India visit canceled)

बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केल्यानंतरही ब्रिटनकडून भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकण्यात आलेलं नाही. ब्रिटनमधील अनेक वैज्ञानिकांनी भारतातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकण्याचा सल्ला दिला होता. भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकल्यानंतर भारतातील प्रवासावर बंदी आणली जाईल. ब्रिटन सरकारच्या एका सल्लागाराने इशारा दिला आहे की, भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकलं जावं. कारण, भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारच्या प्रभावाचा अभ्यास अद्याप होऊ शकलेला नाही.

दोन्ही देशांमध्ये होणार होती द्विपक्षीय चर्चा

बोरिस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार होते. जॉन्सन यांच्या भारत दौऱ्याची पुष्टी दोन्ही देशांकडून करण्यात आली होती. मात्र, जॉन्सन यांच्या दौऱ्याचा नेमका कार्यक्रम कसा असेल, याची घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा 26 एप्रिलपासून सुरु होणार होता. या दौऱ्यात ते मुंबई आणि पुण्यालाही भेट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार जॉन्सन यांचा भारत दौऱ्याच्या कालावधी कमी करण्यात आला होता.

दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात 25 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

संबंधित बातम्या :

Delhi Curfew : एकही आकडा लपवला नाही, केजरीवालांचं उद्धव ठाकरेंच्या पावलावर पाऊल, दिल्लीत आठवडाभर लॉकडाऊन

निवडणुकांमुळे कोरोना वाढला असता तर महाराष्ट्रात 60 हजार आणि बंगालमध्ये 4 हजारच रुग्ण का; अमित शाहांचा प्रतिसवाल

British Prime Minister Boris Johnson’s India visit canceled