पंतप्रधानांच्या गुजरातमध्येच निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांना थेट इशाराच दिला

वटी गावातून जाणारी अंबिका नदीमुळे आता जनतेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांच्या गुजरातमध्येच निवडणुकीवर बहिष्कार, नागरिकांना थेट इशाराच दिला
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:31 PM

नवी दिल्ली: गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने सध्या गुजरातचीच चर्चा आहे. डिसेंबर महिन्यामध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. पण, नवसारी जिल्ह्यातील गावामधील नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहेत. नवसारीत वाहणारी अंबिका नदी अनेक गावातून जाते, त्या नदीवर वटी गावाचाही समावेश आहे.

वटी गावातून जाणारी अंबिका नदीमुळे आता जनतेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही नदी ओलांडण्यासाठी पूल बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आपल्याला पाण्यातून नदी पार करावी लागत असल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे येथील नागरिक नदीच्या पाण्यातून प्रवास करत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

वटी गावचे माजी सरपंच बाळभाई पाडवी म्हणतात की, वर्षभर नदी ओलांडूनच दुसऱ्या गावामध्ये जावे लागते. किंवा 25 किमीचा प्रवास करूनच नदी जावे लागेल.

पावसाळ्याच्या दिवसात या नदीमुळे सर्व व्यवहार ठप्प होतात. पावसाळ्यात नदी पाणीपातळीत वाढ झाली की, अनेक नागरिक गावामध्येच अडकून पडत असल्याचे सांगतात.

हा प्रश्न केवळ वाटी गावातील लोकांचाच नाही तर डांग आणि तापी जिल्ह्यातील लोकांचाही आहे. वटी व्यतिरिक्त, खरजई, कळंबा, सदरदेवी, सारा आणि केवडी, डुंगर्डा, बोरीगावठा, चिकार, जावडा, रायगड, अमोनिया आणि अल्मोरी यासह सुमारे 15 गावातील लोकांना या प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांनी यावेळी पूल नाही तर मत नाही असा पवित्रा घेतला आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.