AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भयानक हट्ट, वैतागून पतीने 5 व्या दिवशीच..

लग्न जुळलं की तरूण-तरूणी एकमेकांसोबतच्या सुखी भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला लागतात. वरात येते, थाटामाटात लग्न होतं, सप्तपदी घेतल्या जातात आणि संसाराला सुरूवात होते. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी काही धक्कादायक सत्य कळलं तर ?

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भयानक हट्ट, वैतागून पतीने 5 व्या दिवशीच..
लग्नाच्या रात्री जे कळलं पतीने 5 दिवशीच..Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 13, 2025 | 8:50 AM
Share

लग्न जुळलं की तरूण-तरूणी एकमेकांसोबतच्या सुखी भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला लागतात. वरात येते, थाटामाटात लग्न होतं, सप्तपदी घेतल्या जातात आणि संसाराला सुरूवात होते. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी काही धक्कादायक सत्य कळलं तर ? असंच काहीसं उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील तरूणासोबत झालं. त्याचं लग्न ठरलं, हसतमुखाने तो बोहल्यावर चढला. पण लग्ना लागल्यावर पहिल्याच रात्री त्याच्या बायकोने त्याच्यासमोर असा विचित्र हट्ट केला की तो ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली, सगळी स्वप्न चक्काचूर झाली.

माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं, पण माझं माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे. जिच्यासोबत सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली, तिच्याच तोंडून दुसऱ्या पुरूषाबद्दलच्या या गोष्टी ऐकून त्या वराच्या सर्व आशा धुळीस मिळाल्यास, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दुसऱ्या दिवशी सकाळीच वराने ही गोष्ट त्याने त्याच्या कुटुंबियांना सांगितली.

कुटुंबियांना कळताच हंगामा

हे ऐकल्यावर मग वधूच्या पालकांनाही बोलावण्यात आले. खूप गोंधळ झाला, पण वधू तिच्या हट्टावर ठाम राहिली. मग चौथ्या दिवशी ती अचानक घरातून पळून गेली. पण गावकऱ्यांनी तिला थांबवले आणि तिच्या सासरच्या लोकांच्या स्वाधीन केले. पालकांना पुन्हा बोलावण्यात आले. अखेर पंचायत बोलावण्यात आली. शेवटी लग्नाच्या 5 व्या दिवसानंतरच नवऱ्याने त्याच्या बायकोचे लग्न तिच्या बॉयफ्रेंडशी लावून दिलं.

हे प्रकरण संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 मे रोजी तमकुहिराज पोलीस स्टेशन हद्दीतील गाझीपूर येथील रहिवासी मुन्ना राजभर यांचा मुलगा ब्रजेश राजभर याचा विवाह रामदास बागी पोलीस स्टेशन कटेया जिल्हा गोपालगंज बिहार येथील दिलीप भर यांची मुलगी कोशिला कुमारी हिच्याशी झाला होता. दुसऱ्या दिवशी तरूणीने माहेरच्यांचा निरोप घेतला आणि ती तिच्या सासरच्या घरी पोहोचली. लग्नाच्या रात्री पत्नीने तिच्या पतीला तिच्या प्रियकराबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. वधूला समजावून सांगण्यात आले.

प्रियकरासोबतच राहण्याचा हट्ट

त्यानंतर नवविवाहित महिला चार दिवस तिच्या सासरच्या घरी राहिली, परंतु पाचव्या दिवशी, सोमवारी, नवविवाहित महिला तिच्या सासरच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. नवविवाहित महिलेला अशा प्रकारे घरातून एकटी बाहेर पडताना पाहून गावकऱ्यांना संशय आला. तिला ताबडतोब थांबवण्यात आले आणि तिच्या सासरच्यांना कळवण्यात आले. काही वेळाने, सासरचे लोक आले आणि नवविवाहित वधूला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले मी माझ्या प्रियकरासोबतच राहील, असं नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्यांनाही स्पष्टपणे सांगितलं.

लग्नाच्या पाचव्या दिवशीच पत्नीची प्रियकरासोबत पाठवणी

त्यानंतर सासरच्यांनी नवविवाहित वधूच्या पालकांना याबद्दल माहिती दिली. यानंतर तिचे पालक आणि इतर लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला पण नवविवाहित महिलेने लग्नाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि मला प्रियकरासोबतच आयुष्य जगायचं आहे, विनंती करू लागली. खूप प्रयत्न करूनही नवविवाहित वधूने कोणाचंही ऐकण्यास नकार दिला. दोन्ही पक्षांचे लोक तामकुहीराज तहसीलमध्ये पोहोचले आणि त्यांनी प्रियकराचे मत विचारण्यासाठी त्याला घटनास्थळी बोलावले. प्रियकराने तिला आपल्यासोबत ठेवण्याची आणि सात जन्म तिच्यासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. त्याचं ऐकल्यानंतर त्या तरूणाने (पतीने) एक शपथपत्र तयार करून घेतले आणि लग्न झाल्याच्या पाचव्या दिवशीच आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवून दिलं. सध्या सगळीकडे याच लग्नाची चर्चा सुरू आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.