मोठी बातमी! अमेरिकेनंतर आता ब्रिटनचा भारताला सर्वात मोठा धक्का, केली मोठी घोषणा, जगात खळबळ
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनंतर आता ब्रिटनने भारताला मोठा धक्का दिला आहे, ब्रिटनकडून मोठी घोषणा करण्यात आल्यानं याचा भारताला फटका बसण्याची शक्यता आहे.

भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारताव 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि रशिया त्या पैशांचा उपयोग हा युक्रेनविरोधातील युद्धात फंडिग म्हणून करतो असा आरोप देखील अमेरिकेकडून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता ब्रिटनने देखील भारताला मोठा धक्का दिला आहे.
ब्रिटन सरकारने बुधवारी रशियाची तेल कंपनी आणि भारतीय पेट्रोलियम कंपनी नायरा एनर्जी लिमिटेड यांच्यावर 90 नवे प्रतिबंध घातले आहेत, हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ब्रिटनने नायरा एनर्जी विरोधात कारवाई करताना म्हटलं आहे की, या कंपनीने 2024 मध्ये अब्जो रुपयांच्या कच्च्या तेलाची आयात ही रशियाकडून केली आहे. ब्रिटन रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या फंडिग स्त्रोतांवर हल्ला करत राहील, अशा परिस्थितीमध्ये रशियाला होत असलेल्या नफ्याला प्रतिबंध घालणं हाच ब्रिटनचा उद्देश असल्याचं ब्रिटन सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आम्ही उचललेल्या या पावलामुळे रशियाला होणारी फंडिग थांबवली जाईल, कारण रशिया कच्च्या तेलाच्या विक्रीमधून युद्धासाठी सध्या मोठ्या प्रमाणात फंडीग उभारत आहेत, असा दावा ब्रिटन सरकारकडून करण्यात आला आहे. नयरा कंपनीने 2024 मध्ये पाच अब्ज डॉलर किंमतीचं 10 कोटी बॅरल तेल एकटं रशियाकडून आयात केलं आहे.
दरम्यान अमेरिकेनं सध्या भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला आहे, भारतावर वेगवेगळ्या मार्गानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तरी देखील भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असाही दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला असं सांगितलं की आम्ही रशियाकडून तेलाची खरेदी बंद करू म्हणून, मात्र यावर अद्याप भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
