देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळण्याचा मार्ग मोकळा, तीन नावं आघाडीवर

नवी दिल्ली : भारताला आतापर्यंत अनेक महिला न्यायाधीश लाभल्या आहेत. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील या महिला न्यायाधीशांनी अनेक महत्त्वाचे निकालही दिले आहेत. मात्र सरन्यायाधीशपदाची जबाबदारी अद्याप कोणत्याही महिलेला मिळालेली नाही. क्षमता आणि अनुभवाच्या बळावर हे पदही महिला भूषवू शकतात, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता मात्र या प्रयत्नांना यश […]

देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळण्याचा मार्ग मोकळा, तीन नावं आघाडीवर
सर्वोच्च न्यायालय
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:53 AM

नवी दिल्ली : भारताला आतापर्यंत अनेक महिला न्यायाधीश लाभल्या आहेत. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील या महिला न्यायाधीशांनी अनेक महत्त्वाचे निकालही दिले आहेत. मात्र सरन्यायाधीशपदाची जबाबदारी अद्याप कोणत्याही महिलेला मिळालेली नाही. क्षमता आणि अनुभवाच्या बळावर हे पदही महिला भूषवू शकतात, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता मात्र या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने (Supreme Court Collegium) केलेल्या 9 नावांच्या शिफारशीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. (BV Nagratna may be India’s first woman Chief Justice? Centre clears names of all 9 judges sent by SC Collegium)

केंद्राची 9 नावांच्या शिफारशींना मंजूरी

सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे नव्या सरन्यायाधीशपदाच्या नियुक्तीकरिता 9 नावांच्या शिफारशीकरिता मंजूरीची विनंती केली होती. या 9 नावांमध्ये आठ जज आणि सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलाचाही समावेश आहे. 1) कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.एस.ओका (हे सध्या देशातील उच्च न्यायालयांतील सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती ओका नागरी स्वातंत्र्यावरील निर्णयांसाठी ओळखले जातात. कोविड 19 महामारी दरम्यान, त्यांनी स्थलांतरित कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक आदेश पारित केले)

2) गुजरात हायकोर्टाचे चीफ जस्टिस विक्रम नाथ, 3) सिक्कीम हायकोर्टाचे चीफ जस्टिस जेके माहेश्वरी, 4) तेलंगणा हायकोर्टाच्या चीफ जस्टीस हिमा कोहली 5) केरळ हायकोर्टाच्या चीफ जस्टीस बी. व्ही. नागरत्ना 6) मद्रास हायकोर्टाचे चीफ जस्टिस सीटी रवींद्र कुमार 7) गुजरात हायकोर्टाचे चीफ जस्टिस एमएम सुंदरेश 8) गुजरात हाय कोर्टाच्या चीफ जस्टीस बेला त्रिवेदी 9) वरिष्ठ वकील पीएस नरसिम्हा

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या नियुक्त्यांकरिता सीजेआय एन. व्ही. रमण यांच्या नेतृत्वातील सुप्रीम कोर्ट कॉलेजियम यांच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या सर्व नावांना केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे.

महिलांमध्ये न्यायमूर्ती बीव्ही नागरत्नांचे नाव अग्रक्रमावर

सरन्यायाधीशपदावर नियुक्त होण्याची शक्यता असलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना यांचा समावेश असून त्या भारताच्या पहिल्या महिला सर न्यायाधीश बनण्याची दाट शक्यता आहे. 2027  मध्ये त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  यासंबंधीची सर्व औपचारिकता आणि नियुक्त्यांची पूर्तता प्रक्रिया सुरु झाली आहे, अशीही माहिती आहे. नियोजित प्रक्रियेनुसार, सर्व काही घडले तर सुप्रीम कोर्टात लवकरच 9 सरन्यायाधीश शपथ घेतील. तसेच तलंगणाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली या हायकोर्टाच्या एकमेव कार्यरत महिला मुख्य न्यायाधीश आहेत.

सरन्यायाधीशांची निवड कशी होते?

भारतात सरन्यायाधीशांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या न्यायमूर्तींची शिफारस राष्ट्रपतींना केली जाते. राष्ट्रपती केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या सल्ल्यानं सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात.  सध्याचे सरन्यायाधीश एन व्ही रमण असून त्यांनी 24 एप्रिल 2021 रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. ते भारताचे 48 वे सर सरन्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजीपर्यंत असणार आहे. रमण हे आंध्रप्रदेशाचे अॅडिशनल अॅडव्होकेट जनरल म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. 27 जून 2000मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले.

इतर बातम्या :

आणीबाणीत आंदोलन, थेट मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत नवे सरन्यायाधीश रमण्णा?

नागपूरचे सुपुत्र जस्टीस शरद बोबडे सुप्रीम कोर्टाचे 47 वे सरन्यायाधीश

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.