AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा

या परिक्षेसंबंधी नियमही जारी करण्यात आले आहेत. जर तुम्ही ही परिक्षा देणार असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे.

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा
प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Feb 03, 2021 | 9:01 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE 10th-12th Date Sheet) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालं आहे. अखेर विद्यार्थ्यांना विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. 4 मे ते 10 जून या काळात ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झालं आहे (CBSE 10th-12th Date Sheet).

त्यासोबत, या परिक्षेसंबंधी नियमही जारी करण्यात आले आहेत. जर तुम्ही ही परिक्षा देणार असाल तर तुम्हाला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे.

>> 10 वी आणि 12 वीच्या मुख्य परीक्षांमध्ये निश्चित वेळेचं अंतर असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव दूर होईल आणि त्यांना तयारीसाठी वेळ मिळेल.

>> 12 वीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल, वेळ वाचवण्यासाठी असं केलं जात आहे. दुसऱ्या शिफ्टमधील परीक्षा ही परदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.

>> दुसऱ्या शिफ्टमध्ये चार दिवस परीक्षा होईल. या दिवसांमध्ये 10 ची मॉर्निंग शिफ्टमध्ये मुख्य विषयांची परीक्षा असेल. यापैकी जास्त करुन परीक्षा या परीक्षा सेंटरवर होईल. दुपारची परीक्षा निवडक सेंटरवर होईल.

>> जे शिक्षक सकाळच्या शिफ्टला काम करतात त्या शिक्षकांना दुपारच्या शिफ्टला काम करावं लागणार नाही.

>> सीबीएससी बोर्ड परीक्षेचे कंट्रोलर डॉ. संयम भारद्वाजकडून जारी केलेल्या या नियमांनुसार, यावर्षी कमीत कमी दिवसांमध्ये या परीक्षा आयोजित केल्या जातील. गेल्या वर्षी 2020 मध्ये परीक्षा शेड्युल 45 दिवसांचा होत. यंदा हा 39 दिवसांचा असेल.

>> 10 वीच्या वर्गाची 75 विषयांची परीक्षा आणि 12 वीच्या 111 विषयांची परीक्षा होईल.

सीबीएसईचं वेळापत्रक कसं पाहाल?

1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या. 2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा. 3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल. 4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.

CBSE 10th-12th Date Sheet

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यात सीबीएसईच्या परीक्षांचाही समावेश होता. अखेर कमी होत असलेल्या निर्बंधांनंतर शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झालीय. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.

CBSE 10th-12th Date Sheet

संबंधित बातम्या :

विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की न्यायालयाच्या चकरा मारायच्या? उच्च न्यायालयाने CBSE ला फटकारलं

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.