CBSE बोर्ड दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, बोर्डाचं स्पष्टीकरण

सीबीएसई बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे (CBSE Board not yet declare 10th and 12th Result date).

CBSE बोर्ड दहावी-बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही, बोर्डाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे (CBSE Board not yet declare 10th and 12th Result date). मात्र, सीबीएसई बोर्डाकडून अधिकृतपणे अशी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर अनेक माध्यमांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने निकालाची बातमी दिली होती. मात्र ‘एएनआय’नेही हे वृत्त मागे घेत असल्याचं नमूद केलं (CBSE Board not yet declare 10th and 12th Result date).

सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत चुकीची माहिती फिरत आहे. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकालाबाबत एक नोटीस सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, ही नोटीस खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा फेक नोटीसवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सीबीएसई बोर्डाने काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या माहितीत 15 जुलैपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले होते. मात्र, सीबीएसई बोर्डाकडून अद्याप तशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बोर्डाकडून परीक्षांच्या निकालाबाबत तयारी सुरु आहे. निकालाची तारीख लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोरोना संकटामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल रखडला आहे. परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर परीक्षेच्या निकालाबाबत चुकीची माहिती फिरत असल्याचं समोर आलं आहे.

सीबीएसई बोर्डाचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनदरम्यान सर्व शाळा, महाविद्यालय बंद होते. मात्र, लॉकडाऊन नंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढला. त्यामुळे लॉकडाऊन आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आला. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी सीबीएसई बोर्डाने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सीबीएसई बोर्ड आगामी वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातून संपूर्ण धडे काढण्याऐवजी काही विशिष्ट मुद्दे काढणार आहे. जे मुद्दे किंवा प्रकरणे गेल्यावर्षाच्या वर्गात होते ते अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम ठरवला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *