15 ऑक्टोबर नंतर शाळा सुरू करण्यास केंद्राची परवानगी, केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांची माहिती

कोरोना संसर्गामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. (Central Education Ministry allow to reopening of schools and coaching institutions after 15th Oct)

15 ऑक्टोबर नंतर शाळा सुरू करण्यास केंद्राची परवानगी, केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल यांची माहिती
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 7:13 PM

नवी दिल्ली: कोरोना संसर्गामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. शिक्षण मंत्रालयाने शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी शाळा सुरू करण्यासाठी कार्यपद्धती ठरवावी, असे पोखरियाल यांनी म्हटले आहे. शाळांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी राज्यांनी स्वतःची प्रमाणित कार्यपद्धती प्रक्रिया तयार करणे. शाळांमध्ये शारीरिक, सामाजिक अंतरांसह शिक्षण देण्यात यावे, असेही निशंक यांनी स्पष्ट केले. (Central Education Ministry allow to reopening of schools and coaching institutions after 15th Oct)

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं, “ज्या शाळा सुरु होतील त्यांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळांनी राज्याच्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करणं बंधनकारक आहे. शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि शारीरिक अंतर ठेऊन शिक्षण घेण, अशा दोन प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी पालकांची लेखी संमती असेल तरच शाळांमध्ये हजर राहू शकतात. हजेरीच्या नियमांमध्ये देखील काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. विद्यार्थी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाईन क्लासचा पर्याय देखील निवडू शकतात.”, असे पोखरियाल यांनी म्हटले.

शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना आणि मुलांना वाटप करताना पूर्ण खबरदारी घेतली जावी. एनसीआरटीचं पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.

30 सप्टेंबरच्या केंद्रीय गृहविभागाच्या सूचनांनुसार राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेश कोरोना संदर्भातील आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांसह 15 ऑक्टोंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात, केंद्रीय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार काही बाबींचे पालन करण्यात यावे, असे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

शाळतेली सर्व ठिकाणांची स्वच्छता आणि डिसइन्फेक्शन करण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी विविध प्रकारची मदत पथके तयार करावीत. राज्य सरकारांच्या सूचनांनुसार शाळांनी स्वत:ची कार्यपद्धती ठरवावी. शारीरीक आणि सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी फेस मास्कचा वापर करावा. कोरोना संदर्भात पालक, विद्यार्थी,शिक्षक, समाज, वसतिगृह स्टाफ यांच्यामध्ये जनजागृती करण्यात यावी. सर्व वर्गांच्या शैक्षणिक वेळापत्रकात परीक्षा आणि सुट्टी यांच्या संदर्भात बदल करण्यात यावा. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची नियमित कालावधीनंतर आरोग्य तपासणी करण्यात यावी. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून आरोग्या संदर्भात नियमितपणे माहिती गोळा करण्यात यावी.

संबंधित बातम्या:

मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्याच शैक्षणिक पदवीवर प्रश्नचिन्ह

NEET JEE-Mains Exam Dates | ‘नीट’ आणि ‘जेईई-मेन्स’ परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

(Central Education Ministry allow to reopening of schools and coaching institutions after 15th Oct)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.