केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अटीशर्तींसह दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अटीशर्तींसह दुकानं सुरु ठेवण्यास परवानगी

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने मॉल्स किंवा मोठी दुकान वगळता इतर दुकानदारांना दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी दिली (Local shops to open) आहे.

Namrata Patil

|

Apr 25, 2020 | 10:33 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सर्वत्र लॉकडाऊन (Local shops to open) करण्यात आलं आहे. मात्र यादरम्यान केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) मॉल्स किंवा मोठी दुकान वगळता इतर दुकानदारांना दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र यात काही अटीही घालण्यात आल्या आहेत. आज (25 एप्रिल) हा निर्णय सर्वत्र लागू होणार आहे.

केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने रमजानचा महिना असल्याने हे आदेश जारी केल्याचं (Local shops to open) म्हटलं जात आहे. या आदेशानुसार, शॉपिंग मॉल्स वगळता इतर सर्व दुकाने सुरु केली जाणार आहेत. ही सवलत केवळ काहीच दुकानांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही मोठे मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर सुरु करु नयेत, असेही यात म्हटलं आहे.

दुकान सुरु ठेवण्यासाठी ‘या’ अटी

यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार सर्वप्रथम दुकानांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी. तसेच दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन (Ministry of Home Affairs) करावे. त्याशिवाय दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. ही सर्व दुकानं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या आस्थापना कायद्यांतर्गत नोंद असणे गरजेचे आहे.

हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांना सवलती नाही

मात्र महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या दुकानांना ही सवलत लागू होणार नाही. या ठिकाणची दुकाने 3 मे पर्यंत पूर्णपणे बंद राहतील. त्यासोबत मोठी दुकानं तसेच विविध मॉलसारख्या दुकानांना ही सवलत लागू होणार नाही, असेही यात गृहसचिव अजय भल्ला यांना स्पष्ट केलं आहे. देशातील कोरोना हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोन असलेल्या ठिकाणी दुकान सुरु करण्याची सूट दिली जाणार नाही.

काय आहेत नवे आदेश ?

1. आस्थापना कायद्यांतर्गत नोंद असलेली सर्व दुकाने सुरु करण्याची परवानगी 2. निवासी भागातील काँम्प्लेक्समधली दुकाने सुरु होणार 3. निवासी भागातील मार्केट कॉम्प्लेक्स सुरु होणार 4. निवासी भागातील सर्व प्रकारची एकटी-दुकटी दुकाने सुरु करण्याची सूट 5. दुकाने, काँप्लेक्समध्ये 50% स्टाफ ठेवण्याची अट 6. महापालिका,नगरपालिकांना क्षेत्रातील दुकानांना परवानगी नाही 7. मल्टीब्रँड आणि सिंगल ब्रँडचे मॉल्स बंदच राहणार 8. हॉटस्पॉट, प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध 15 तारखेच्या आदेशाप्रमाणेच

दरम्यान कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र केवळ (Ministry of Home Affairs) अत्यावश्यक सेवेची दुकान सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली होती. यात अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला सुरु ठेवण्याची सूट मिळाली होती. मात्र मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला (Local shops to open) होता.

संबंधित बातम्या : 

पाच महिने सहा दिवसांपासून पंतप्रधानांचा एकही परदेश दौरा नाही, सहा वर्षात दुसऱ्यांदा घडलं!

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का, पुढील दीड वर्ष महागाई भत्त्यात वाढ नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें