समता, सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा आरंभ, जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन!
केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

Caste Census Decision : केंद्र सरकारने नुकतेच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल रोजीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. केंद्रीय शिक्षणंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले असून सबका साथ सबका विकास यासोबतच सामाजिक न्यायच्या भूमिकेलाही या निर्णयामुळे सशक्ती मिळाली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर भाष्य केलंय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारने जनगणनेत जातीनिहाय जनगणनेचा समावेश करण्याचं ठरवलं आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत करतो. वंचित, मागास यांनी नीती ठरवताना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी, समाजातील सर्वच स्तरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक असमानतेला पारदर्शी तसेच प्रामाणिक पद्धतीने दूर करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वच वर्गातील अधिकार सुनिश्चित करण्यासाठीही हे एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे,’ असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून…
तसेच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून एक यशस्वी सरकार चालवत आहेत. मोदी संविधानाच्या मूळ भावनेला अनुसरून सर्वांची साथ-सर्वांचा विकास या संकल्पासोबत सरकार सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक सरकार चालवत आहेत,’ असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
समता, समरसता, सुशासन और सामाजिक न्याय के एक नए युग का आरंभ!
प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में केंद्रीय कैबिनेट ने आज की आवश्यकताओं को ध्यान में रखते हुए जातिगत जनगणना को आगामी जनगणना में शामिल करने की स्वीकृति प्रदान की है। इस ऐतिहासिक निर्णय का स्वागत करता हूँ।…
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) April 30, 2025
धर्मेंद्र प्रधान यांची काँग्रेसवर टीका
त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेस तसेच विरोधकांवर टीकाही केली. ‘काँग्रेस तसेच विरोधी पक्षांनी जातीनिहाय जनगणनेच्या विषयावर लोकांची नेहमीच फसवणूक केलेली आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा या विषयाला फक्त कास्ट सर्वेपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले. जातिनिहाय जनगणनेला कधीही जनगणनेचा भाग करण्यात आले नाही,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच मात्र मोदी यांची नीती ही स्पष्ट आणि दूरदर्शी निर्णय घेणारी आहे. इतिहासात झालेल्या चुका सुधरणारा केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच हे शक्य झाले,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
