AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रबाबू नायडू यांची अबू धाबीमधील BAPS मंदिराला भेट, म्हणाले हे मंदिर शांततेच जागतिक प्रतिक

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अबू धाबी स्थित BAPS हिंदू मंदिराला भेट दिली, यावेळी त्यांनी या मंदिराचं कौतुक करताना हे मंदिर शांततेचं जागतिक प्रतिक असल्याचं म्हटलं आहे.

चंद्रबाबू नायडू यांची अबू धाबीमधील BAPS मंदिराला भेट, म्हणाले हे मंदिर शांततेच जागतिक प्रतिक
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 3:02 PM
Share

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अबू धाबी स्थित BAPS हिंदू मंदिराला भेट दिली, यावेळी त्यांनी या मंदिराचं कौतुक करताना हे मंदिर शांततेचं जागतिक प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. हा एक मोठा चमत्कार आहे, या मंदिराला भेट देणं हा मा‍झ्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव आहे, असं देखील चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. ब्रह्मविहारीदास स्वामी यांनी नायडू यांचं स्वागत केलं, तसेच यावेळी त्यांना मंदिरातील सुंदर कोरीव काम, आधुनिक तंत्रज्ञान आणि एकतेचा संदेश याबद्दल माहिती देखील देण्यात आली, चंद्रबाबू नायडू यांनी या मंदिराच्या स्थापत्य शैलीचं कौतुक करताना म्हटलं की, मंदिरात जुन्या परंपरा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे मेळ घालण्यात आला आहे की, आजच्या तरुण पिढीला ते सहज समजेल.

चंद्रबाबू नायडू यांनी या मंदिरात प्रार्थना केली, त्यानंतर त्यांनी ब्रह्मविहारीदास स्वामी यांच्या दृष्टीकोणाचं देखील कौतुक केलं आहे, ब्रह्मविहारीदास स्वामी यांच्या प्रयत्नामुळेच हे मंदिर तयार झालं. हा एक चमत्कारच आहे, इथे महान लोकांचे स्वप्न नेहमीच पूर्ण होतात, असंही यावेळी नायडू यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी यूएई सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचं देखील कौतुक केलं आहे. दोन्ही देशांच्या सहकार्यामुळेच एवढी मोठी आणि भव्य वास्तू निर्माण होऊ शकली, हा एक असा वारसा आहे, ज्याला कायम लक्षात ठेवलं जाईल असंही यावेळी नायडू यांनी म्हटलं.

यावेळी बोलताना नायडू यांनी म्हटलं की, फार थोडे लोक इतिहास घडवतात, मला तुमच्या व्यापक आणि दूरदर्शी दृष्टिकोनात ते दिसत आहे. तुम्ही परंपरांना आधुनिकतेशी, श्रद्धेला तंत्रज्ञानाशी आणि मानवतेला एकत्र आणणारा जो तुमचा दृष्टिकोण आहे, तो खरोखरच धर्माच्याही पलीकडे आहे. मी इथे जागतिक दृष्टीकोणाचा अनुभव घेतला आहे, ही एक असामान्य कामगिरी आहे, त्यासाठी मी तुमचं मनापासून कौतुक करतो, असं यावेळी चंद्रबाबू नायडू म्हणाले, ते तीन दिवसांच्या अबू धाबी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी या मंदिराला भेट दिली.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.