Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी

Chhattisgarh Maoist attack डेप्युटी कमांडर संदीप द्विवेदी हे CRPF च्या 201 कोब्रा बटालियनमध्ये आहेत. सैनिक स्कूलमधून पासआऊट असलेले संदीप द्विवेदी यांच्या धाडसाचे अनेक किस्से आहेत.

Chhattisgarh Naxal attack : एकाच हातावर दोन गोळ्या लागल्या, तरीही वीर जवान भिडला, कमांडरची डॅशिंग कहाणी
CRPF Commander Sandeep Dwivedi

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा इथे झालेल्या भीषण नक्षलवादी हल्ल्याने (Chhattisgarh Maoist attack) सुरक्षादलाची झोप उडाली आहे. घात करुन केलेल्या हल्ल्यात CRPF चे तब्बल 22 जवान शहीद झाले आहेत. इतकंच नाही तर तब्बल 33 जवान जखमी आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आज जगदलपूर येथे अंतिम सलामी दिली. यावेळी अमित शाह यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, सीआरपीएफ, एसटीएफ, डीआरजी आणि छत्तीसगड पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  (Chhattisgarh Maoist attack CRPF dy commander Sandeep Dwivedi injured in sukma naxal attack)

200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे इतके जवान शहीद झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुरक्षा एजन्सी आणि गुप्तचर यंत्रणांचं हे मोठं अपयश मानलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यात CRPFचे फील्ड कमांडर, ऑपरेशन सेकेंड इन कमांडर ऑफिसर संदीप द्विवेदी (Sandeep Dwivedi ) हे सुद्धा जखमी झाले आहेत. त्याशिवाय डेप्युटी कमांडर मनीष कुमार यांनाही मोठी दुखापत झाली आहे.

संदीप द्विवेदींचा प्रवास

डेप्युटी कमांडर संदीप द्विवेदी हे CRPF च्या 201 कोब्रा बटालियनमध्ये आहेत. सैनिक स्कूलमधून पासआऊट असलेले संदीप द्विवेदी यांच्या धाडसाचे अनेक किस्से आहेत. सुकमा हल्ल्यात त्यांच्या उजव्या हातावर दोन गोळ्या लागल्या. अशा परिस्थितीतही ते नक्षलवाद्यांशी भिडले. संदीप यांचा हात रक्तबंबाळ झाला होता. अशा परिस्थितीत ते नक्षलवाद्यांविरोधात लढत होते.

संदीप द्विवेदी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. CRPF चे डायरेक्टर जनरल कुलदीप सिंह यांनी काल त्यांची भेट घेतली. सध्या संदीप यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते हसतमुखाने थम दाखवत आहेत.

जनरल कुलदीप सिंह यांच्या मते, नक्षलवादी सध्या नैराश्यात आहेत. त्यांनी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आपले कॅम्प उभे केले आहेत. आता आणखी तीव्रपणे त्यांच्याविरोधात ऑपरेशन सुरु केलं जाईल.

नक्षलवाद्यांनी घात केला

CRPF ला नक्षलवाद्यांचे दोन टॉप कमांडर मादवी हिडमा आणि सुजाता हे दबा धरुन बसल्याची माहिती मिळाली होती. मात्र असं काहीच नव्हतं, नक्षलवाद्यांनी जवानांना मारण्यासाठी टाकलेलं हे जाळं होतं.

सीआरपीएफला गुप्त माहिती मिळाल्यानंतर, तब्बल 2000 जवानांना सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आलं. या तुकड्या मोहिमेवर पाठवण्यात आल्या. यामध्ये कोबरा युनिटचाही समावेश होता.

या जवानांना बस्तरिया बटालियन आणि राखीव तुकड्यांच्या युनिटवरुन पाठवण्यात आलं. जिथे नक्षली कमांडर असल्याची माहिती मिळाली, तिथे एक टीम दाखल झाली. मात्र त्याचवेळी घात झाला. जवपास 400 नक्षलवाद्यांनी जवानांना तिन्ही बाजूने घेरलं होतं. जवानांनी संख्या कमी आणि नक्षवादी मोठ्या संख्येने असलेल्या त्या ठिकाणी प्रचंड मोठी चकमक झाली. सीआरपीएफचे जवान नेटाने लढले. पण तब्बल 22 जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्याव लागली.

अधिकाऱ्यांच्या मते, नक्षलवाद्यांनी ठरलेल्या रणनीतीप्रमाणे हल्ला चढवला. जवानांना U आकारात घेरण्याची व्यूहरचना नक्षलवाद्यांनी आखली होती, त्यामध्ये ते यशस्वी ठरले.

संबंधित बातम्या 

नक्षलवाद्यांविरोधात आता ‘ऑपरेशन प्रहार-3’; ‘हे’ 8 नक्षली कमांडर सुरक्षा दलाच्या रडारवर

Chhattisgarh Maoist attack: बिजापूरच्या चकमकीत 22 भारतीय जवान शहीद; सापळा रचणारा नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा कोण आहे? 

Chhattisgarh Maoist Attack: नक्षलवाद्यांनी कसा हल्ला केला, भारतीय सुरक्षादलांची चूक कुठे झाली, वाचा इनसाईड स्टोरी

Chhattisgarh Naxal Attack : नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक, शहीदांचा आकडा 22 वर

Published On - 2:03 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI