success story | वडील सुप्रीम कोर्टात स्वयंपाकी, पण मुलीने जे केले त्यानंतर सरन्यायाधीश करु लागले कौतूक

success story | प्रज्ञाचे वडील अजय कुमार सामल सुप्रीम कोर्टात स्वयंपाकी आहेत. तिची आई गृहिणीच आहे. प्रज्ञा कॅलिफोर्निया विद्यापीठ किंवा मिशिगन, यूएसए मधून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. त्याबदल तिचा गौरव झाला.

success story | वडील सुप्रीम कोर्टात स्वयंपाकी, पण मुलीने जे केले त्यानंतर सरन्यायाधीश करु लागले कौतूक
dhananjay chandrachud
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 3:47 PM

नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : संघर्ष करण्याची तयारी असले तर समोर कशीही परिस्थिती असली तरी तुम्हाला यश मिळू शकते. अनेक जण विपरीत परिस्थिती उल्लेखनीय यश मिळवतात. आता सर्वोच्च न्यायालयात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीचे यश समोर आले आहे. तिच्या या यशाची भुरळ सरन्यायधीस धनंजय चंद्रचूड यांनाही पडली. त्यांनी तिचे भरभरुन कौतूक केले. त्या मुलीने अनेक अडचणींचा सामना करून सात समुद्रापार परदेशात आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे तिला अमेरिकत एक नव्हे दोन शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत.

प्रज्ञाला दिली तीन पुस्तके

प्रज्ञाचे वडील अजय कुमार सामल सुप्रीम कोर्टात स्वयंपाकी आहेत. तिची आई गृहिणीच आहे. प्रज्ञा कॅलिफोर्निया विद्यापीठ किंवा मिशिगन, यूएसएमधून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. बुधवारी प्रज्ञा हिचा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींनी तिचा गौरव केला. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि इतर न्यायमूर्तींची स्वाक्षरी असलेली भारतीय संविधानावर केंद्रित तीन पुस्तके तिला भेट दिली. हा गौरव झाल्यानंतर प्रज्ञाने आपले दोन्ही हात जोडले आणि सर्वांचे आभार मानले.

सरन्यायाधीशांनी केला गौरव

प्रज्ञाचा सत्कार केल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “आम्हाला माहीत प्रज्ञाने स्वतःच्या बळावर यश मिळवले आहे. परंतु आता तिला जे हवे, ते गाठता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करु. आम्हाला आशा आहे की ती पुन्हा भारतात येईल आणि देशाची सेवा करेल.”

हे सुद्धा वाचा

प्रज्ञाच्या वडिलांचा गौरव

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी प्रज्ञाचे वडील अजय कुमार सामल आणि त्यांच्या पत्नीला शाल देऊन त्यांचा सन्मान केला. त्या वेळी त्यांचे डोळ्यात मुलीचे कौतूक दिसत होते. त्यांचे हात कृतज्ञतेने जोडलेले होते. यावेळी बोलताना प्रज्ञा म्हणाली, ‘सरन्यायाधीश चंद्रचूड हे तिच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. ते तरुण वकिलांना प्रोत्साहन देत असतात. त्यांचे शब्द रत्नांसारखे असतात. मोठी स्वप्ने पाहणे आणि ते पूर्ण करणे त्यांच्या शब्दांमुळे सोपे होते.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.