Whatsapp वर पॉर्न व्हिडीओ पाठवताय? बीडमध्ये दोन गुन्हे दाखल

चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात (Child porn share on social media may cause jail) आलं आहे.

Whatsapp वर पॉर्न व्हिडीओ पाठवताय? बीडमध्ये दोन गुन्हे दाखल
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:53 AM

नवी दिल्ली : चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात (Child porn share on social media may cause jail) आलं आहे. जर चाईल्ड पॉर्न व्हिडीओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडीओ, फोटो तुम्ही कुणाला पाठवला तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातही दोन गुन्हे अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहे. या अज्ञातांनी चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या संबंधित पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा बसवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्राईम फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइटिड चिल्ड्रन (NCMEC) या संस्थेकडे जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून जे चाईल्ड पॉर्न शोधून, डाऊनलोड करुन इतरांना शेअर करतात अशा लोकांवर लक्ष ठेवले जाईल. ही एजन्सी देशभर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम आहे, असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

जर तुम्ही चाईल्ड पॉर्न संबंधित कोणताही व्हिडीओ किंवा फोटो इंटरनेटवर शोधाल, डाऊनलोड कराल किंवा दुसऱ्यांना शेअर कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. केंद्र सरकारनेही याबद्दल कडक करावाईचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा पहिला गुन्हा नोंद झाला आहे. किशन सिंह असं या व्यक्तीचं नाव आहे. हा व्यक्ती अल्मोडा येथे राहणारा आहे. ज्याच्यावर उत्तराखंडच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किशन सिंह इंटरनेटवर चाईल्ड पॉर्न डाऊनलोड करुन फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल माध्यमावर मित्रांना सेंड करत होता. यावर देहरादून पोलिसांनी कारवाई करत निर्देश दिले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश दिले आहेत की, देशातील सर्व सायबर क्राईम विभागात अशा प्रकारच्या घटनावर कडक कारवाई करावी.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल

सायबर सेलकडून राज्यभरात एकूण 27 व्हिडीओवरती कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी दोन व्हिडीओ हे बीड जिल्ह्यातून अपलोड झालेले पोलिसांना आढळले आहेत. एक व्हिडीओ गेवराई, तर दुसरा व्हिडीओ परळी येथून सोशल मीडियावर अपलोड झाला आहे.

या व्हिडीओवर पोलीस अधिक तपास करत आहेत. ज्याने हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले त्याचाही शोध सुरु आहे. त्यामुळे या अज्ञात व्यक्तींवर परळी आणि गेवराईत येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.