शेवटी चीनने बदला घेतलाच, एक निर्णय अन् अमेरिकेत उडाला हाहाकार, चायनाचा ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून चीनवर देखील दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र आता चीनने अचानक असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून, डोनाल्ड ट्रम्प प्रचंड दबावाखाली आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेचे भारतासह चीनसोबत देखील संबंध खराब झाले आहेत, अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीनकडून ट्रम्प यांच्या या नव्या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनवर देखील प्रचंड प्रमाणात टॅरिफ लावला आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे चीनने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे, चीनने अचानक घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. अमेरिकेनं टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंध दुरावले आहेत, मात्र दुसरीकडे चीन आणि भारताची जवळीकता वाढत आहे.
चीनने अमेरिकेची बोलती बंद केली आहे, रेअर अर्थसाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून असलेल्या अमेरिकेला आता आणखी एक मोठ झटका बसला आहे. चीनने अमेरिकेकडून करण्यात येणारी सोयाबीनची खरेदी अचानक बंद केली आहे. चीनने घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत सोयाबीनच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी झाल्या असून अर्ध्यावर आल्या आहेत, अमेरिकेतले सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच दहशतीखाली आहेत.
चीन हा अमेरिकेतल्या सोयाबीनचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार आहे. मात्र आता अचानक चीनने अमेरिकेतून सोयाबीन खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे, अमेरिकेवर आता मोठं आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणेच चीन देखील रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं चीनवर देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र आता योग्यवेळ येताच चीनने अमेरिकेला उत्तर दिलं आहे.
चीन सोयाबीन कुठून खरेदी करणार?
दरम्यान चीनने आता अमेरिकेमधून सोयाबीनची खरेदी अचानक बंद केली आहे, त्यामुळे चीन आता आपली सायोबीनची गरज कुठून पूर्ण करणार असाही एक प्रश्न आहे, मात्र त्याचंही उत्तर आता मिळालं आहे. चीन आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांकडून आपल्याला लागणारं सर्व सोयाबीन खरेदी करणार आहे, हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात असून, चीनच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भूकंप आला आहे.
