AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पकडून पकडून मारलं, आशुतोष रांकांना धक्काबुक्की; दीपके भडकले

जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सरकारी शाळेची पाहणी करताना ग्रामस्थांनी हुसकावून लावले व मारहाणीचा आरोप झाला. शाळेची इमारत जीर्ण असल्याने विद्यार्थी म्हशीच्या तबेल्यात शिकत आहेत. CJP ने भाजपवर टीका केली, तर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पकडून पकडून मारलं, आशुतोष रांकांना धक्काबुक्की; दीपके भडकले
CJPImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 3:08 PM
Share

राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावलं आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी सीजेपीच्या विरोधात आंदोलनही सुरू केलं. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर, सीजेपीचे आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. या सर्व प्रकारावर आशुतोष रांका यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सीजेपी कार्यकर्त्यांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप रांका यांनी केला आहे.

आज सकाळी सीजेपीचे कार्यकर्ते रामपुरा-कंवरपुरा गावात प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. याची कुणकुण ग्रामस्थांना लागल्यानंतर त्यांनी शाळेत धडक दिली. यावेळी गावकऱ्यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना जोरदार विरोध केला. त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना गावातून हाकलून लावलं.  या गावकऱ्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पकडून पकडून मारलं. तसेच आशुतोष रांकाशीही धक्काबुक्की केली.  त्यानंतर या गावकऱ्यांनी सीजेपीच्या विरोधात उलटं धरणे आंदोलनही सुरू केलं. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

यापेक्षा लज्जास्पद काय?

विशेष म्हणेज आशुतोष रांकाही याच शाळेत जाणार होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली होती. रामपुरा, कंवरपुरा येथील शाळेत गेल्या काही वर्षांपासून म्हशीचे तबेले सुरू आहेत. या शाळेची पाहणी करण्यासाठी मी स्वत: जात आहे, असं आशुतोष रांका यांनी म्हटलं होतं. आमचे कार्यकर्ते शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांना शाळेत मारहाण करण्यात आली. मुलांनी म्हशीच्या तबेल्यात शिकावं हे भाजपला मान्य आहे. पण शाळेची दुरावस्था व्यवस्थित करणं त्यांना मान्य नाही. यापेक्षा लज्जास्पद गोष्ट काय असू शकते? असा संतप्त सवाल रांका यांनी केला आहे.

आज तर हद्दच झाली…

गेल्या काही वर्षापासून कंवरपुराच्या रामपुरा शाळेत म्हशीच्या तबेल्यात शाळा सुरू आहे. जेव्हा आम्ही या शाळेची पाहणी करण्यासाठी गेलो तेव्हा बेधडकपणे आमच्यावर हल्ला करण्यात आला. आमच्यावर दगडफेक करण्यात आली. आमच्या कारच्या काचा फोडल्या. आमच्या टीमवर सातत्याने दगडफेक केली जात होती. हल्ला करण्यासाठी ट्युबमध्ये दगड फेकून मारले. माझे तर कपडेही फाडले. हे सर्व मदन दिलावर यांच्या आदेशावर झालं. मुलं म्हशीच्या तबेल्यात शिकली तरी चालेल, पण शाळेची डागडुजी होऊ नये हे मदन दिलावर यांना मान्य आहे, असं आशुतोषने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मदन दिलावर यांनी आमच्या अंगावर गुंडं पाठवून संपूर्ण देशात राजस्थानची नाचक्की केली आहे. पण तुमच्या या गुंडागर्दीला घाबरून जाऊ इतके आम्ही भ्याड नाही. शाळेची डागडुजी तर होईलच, मग वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा इशाराच आशुतोषने दिला आहे.

शाळेची इमारत पडीक

गावातील शाळेच्या दुरावस्थेवरून आधीच नाराजी होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळेची इमारत पडीक झाली आहे. त्यामुळे मुलांना म्हशीच्या तबेल्यात शिकावं लागत आहे. त्यामुळेच सीजेपी कार्यकर्ते शाळेत पोहोचले होते. पण ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. सध्या गावात तणावाची स्थिती आहे. ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

ग्रामस्थ काय म्हणाले?

ग्रामस्थ विष्णू कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात आधी प्राथमिक विद्यालय इयत्ता 5 वी पर्यंत होते. शाळेला माझ्या आजोबांनी जमीन दिली होती. 1999मध्ये शाळेची इमारत तयार झाली. पण त्यानंतर शाळेच्या इमारतीची कधीच दुरुस्ती झाली नाही. शाळेची इमारत इतकी पडीक झालीय की विद्यार्थी बसून अभ्यास करू शकत नाहीये. त्यामुळे गावातील एक मोठं घर मुलांना शिकण्यासाठी दिलं आहे. दोन खोल्यांमध्ये शिक्षक 20-30 विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, असं विष्णू कुमार शर्मा यांनी सांगितलं.

अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया

अभिजीत दीपके यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आशुतोषवर भाजपच्या गुंडांनी राजस्थानात हल्ला केला. राजस्थानच्या पोलिसांनी असं करू दिलं. या हल्ल्यात आशुतोषसहीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी व्यक्त केली आहे. अभिजीत यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Follow Us
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल