AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Vijay : यांची भ्रष्टाचाराची फाईल वेळेवर उघडीन; मुख्यमंत्री विजय यांची धमकी

CM Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. योग्य वेळी मी यांची भ्रष्टाचाराची फाईल उघडीन, अशी धमकीच त्यांनी मागील सरकारला दिली आहे.

CM Vijay : यांची भ्रष्टाचाराची फाईल वेळेवर उघडीन; मुख्यमंत्री विजय यांची धमकी
मुख्यमंत्री विजयImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2026 | 3:13 PM
Share

तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि डीएमके पक्षावर निशाणा साधला आहे. सभागृहात टीव्हीके आणि डीएमके आमदारांमध्ये झालेल्या गदारोळादरम्यान विजय यांनी थेट भ्रष्टाचाराची फाईल उघडण्याची धमकी दिली. “मी मागील डीएमके सरकारच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स योग्य वेळी उघडेन. माझ्या टेबलवर दोन फाईल्स आहेत. आता तसं करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू नका”, असं विजय म्हणाले. थलपती विजय यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. विधानसभेतील भाषणादरम्यान विजय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली.

रस्ते बांधणीतील कथित अनियमिततेवरून विधानसभेत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी सभागृहात हे वक्तव्य केलं. टीव्हीके पक्षाच्या आमदारांनी रस्ते बांधणीतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला. या वादात विजय यांनी हस्तक्षेप करत मागील सरकारने केलेल्या कथित भ्रष्टाचाराचा तपशील असलेल्या फाईल्स समोर आणेन, असा इशारा दिला. राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचं विजय यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे डीएमके आणि टीव्हीके यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

भ्रष्टाचार हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सामान्य नागरिकांवर परिणाम करणारा गंभीर मुद्दा असल्याचं विजय यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर विजय यांच्या सरकारने आता भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. तमिळनाडू सरकार राज्याच्या भ्रष्टाचाराविरोधी संस्था DVAC अंतर्गत सोशल मीडिया मॉनिटरिंग सेंटर म्हणजेच SMMC स्थापन करणार आहे. यासाठी सरकारने 50 लाख रुपयांचा बजेट ठेवला आहे.

डीव्हीएसीकडे सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित सोशल मीडिया माहिती जतन करण्यासाठी कोणतीही समर्पित प्रणाली नाही. त्यामुळे हे नवीन केंद्र या तक्रारी आणि पोस्ट्सची नोंद ठेवेल, जेणेकरून सोशल मीडियावरून मजकूर काढून टाकल्यानंतरही महत्त्वपूर्ण पुरावे जतन केले जातील, असं विजय यांच्या सरकारचं म्हणणं आहे. हे केंद्रातील पथक दिवसाचे 24 तास सोशल मीडियावर लक्ष ठेवून असेल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात