AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janta Party: नाहीतर अमेरिकेत येऊन जीवे मारू… अभिजीत दीपकेंना धमकी देणारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर… Video मध्ये काय दिली कबुली?

Cockroach Janta Party Abhijeet Deepke: क्रॉकरोज जनता पार्टीने देशात एकच काहूर उठवला आहे. प्रत्येकाच्या तोंडी या पक्षाचा मराठमोळा संस्थापक अभिजीत दिपके याच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान अभिजीत दिपके यांना ज्याने धमकी दिली ती व्यक्ती आता समोर आली आहे.

Cockroach Janta Party: नाहीतर अमेरिकेत येऊन जीवे मारू... अभिजीत दीपकेंना धमकी देणारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर... Video मध्ये काय दिली कबुली?
अभिजीत दिपके यांना धमकी देणारी व्यक्ती कोण?Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 23, 2026 | 1:48 PM
Share

Cockroach Janta Party Abhijeet Deepke: क्रॉकरोज जनता पार्टीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तरुणाईची भाषा या पक्षाच्या तोंडी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे मराठी आहेत. त्यांच्या या पक्षाची केवळ भारतातच नाही तर शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेतही चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांना थेट अमेरिकेत जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता धमकी देणारी व्यक्ती समोर आली आहे. एका व्हिडिओत या व्यक्तीने दिपके यांना अश्वील भाषेत शिवीगाळ केल्याचेही उघड झाले आहे.

अमेरिकेत येऊन जीवे मारण्याची धमकी?

देशाच्या सरन्यायधीशांनी केलेल्या टीकेनंतर Cockroach Janta Party या डिजिटल राजकीय चळवळीचा जन्म झाला. अभिजीत दिपके या मराठमोळ्या तरुण या चळवळीचे नेतृत्व करत आहे. अवघ्या काही दिवसातच त्याला तरुणाईने डोक्यावर घेतले आहे. त्यापूर्वी कॉक्रोरच जनता पार्टीचे ट्वीटर अकाऊंट सस्पेन्ड करण्यात आले तर आज इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याची माहिती दिपकेंनी दिली. दरम्यान त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा स्क्रीन शॉट दिपकेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला होता. आपण मांडलेल्या भूमिकेमुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे दिपके यांनी या पोस्टमधून समोर आणले होते. या मॅसेजमध्ये “तुला पैसा मिळेल. तू खाते बंद कर. नाहीतर भाजपमध्ये ये. नाहीतर तुला अमेरिकेत मारून टाकू” असा मजकूर होता.

अभिजीत दिपके यांनी धमकीची माहिती देताच सोशल मीडियावर नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला. एका नवीन पक्षाला कोण इतकं घाबरत आहे, असा प्रश्न विचारला गेला. काहींनी देशात लोकशाही आहे की नाही असा सवाल केला. तर काहींनी अभिजीत दिपके यांना पाठिंबा दिला. अनेकजणांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेण्याची सरकारकडे मागणी केली.

कॉकरोच पायखाली दबेल

दरम्यान अभिजीत दिपके यांना धमकी देणारी व्यक्ती आता समोर आली आहे. या व्यक्तिने स्वतः समोर येत या धमकीविषयी मोठा खुलासा केला आहे. त्याने दिपके यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे. या व्हिडिओतही धकमी देणारी व्यक्तीने दिपके यांना अश्लील शिवीगाळ केल्याचे दिसून आलं आहे. तर त्याचवेळी क्रॉकरोच पायाखाली दबेल असा गर्भित इशाराही त्याने दिला आहे. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून खुलेआम धमकी देणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका,
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही..
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती
मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड...
Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही....
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट